Shivsena ubt chief uddhav thackeray slams bjp over false hindutva in marathi


Uddhav Thackeray On Hindutva : मुंबई : देशात, राज्यात जो काही अंदाधुंद कारभार सुरू आहे. तो थांबवून पुन्हा एकदा खऱ्या हिंदुत्वाचे सरकार स्थापित करणे, हेच आमचे ध्येय आहे. कारण निवडणुकीसाठी धर्मांधता दाखवण्याने देशाचं भलं होणार नाही. त्यासाठी जे खरं हिंदुत्व आहे तेच प्रस्थापित करायला हवं, असे वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. अहिल्यानगर कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी रविवारी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपच्या बेगडी हिंदुत्वावर टीका केली.(shivsena ubt chief uddhav thackeray slams bjp over false hindutva)

अहमदनगर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आज, रविवारी शिवबंधन बांधत ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केला, त्यावेळी ते बोलत होते. नगरमधील अनेक पदाधिकारी हे शिवसेनेत गेले याबद्दल विचारणा केली असता, त्यांनी एकनाथ शिंदेंची शिवसेना ही शिवसेना असल्याचे मी मानतच नसल्याचे सांगितले. तसेच शिवसेनेला संपवलं हा त्यांचा भ्रम असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी देशातील तसेच राज्यातील सरकारवर सडकून टीका केली. राज्यात तसेच देशात सध्या अंदाधुंद कारभार सुरू आहे. जनतेची गाऱ्हाणी ते ऐकून घेत नाहीत. त्यांनी जनतेला फसवले असल्याचेही ते म्हणाले. निवडणुकीच्या काळात वेगवेगळ्या रेवड्या उडवून जनतेला भुलवलं, आणि आता जनता ते भोगत असल्याचेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले. या सर्वांवर मात करत जनतेचं आयुष्य सुखासमाधानाचं करणं, हेच आमचं प्रमुख ध्येय आहे. जे खरं हिंदुत्व आहे ते पुन्हा प्रस्थापित करायचं आहे, यावरही त्यांनी भर दिला.

हेही वाचा – Neelam Gorhe : आधी ठाकरेंवर मर्सिडीज घेण्याचा आरोप, नंतर नीलम गोऱ्हेंनी केली सारवासारव

यावर खरं हिंदुत्व म्हणजे नेमकं काय असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला असता, ठाकरेंनी गाडगेबाबांचे स्मरण केले. धर्म जगायचा असतो, सांगायचा नसतो असे गाडगेबाबा म्हणत. छत्रपती शिवरायांनी देखील कधी दुसऱ्या धर्माचा द्वेष करा असे सांगितले नाही. आणि मी देखील याच तत्त्वावर चालतो. जे या देशाला आपलं मानतात, ते आपले, असे ते म्हणाले. मी मुख्यमंत्री असताना देखील याच तत्त्वावर राज्यकारभार केल्याचेही त्यांनी सांगितले. याउलट निवडणुकीसाठी धर्मांधता दाखवणे योग्य आहे का, असा सवालही त्यांनी केला. त्यांनी धर्माचा खेळखंडोबा केला आहे. त्यांचं मुस्लिम प्रेम राजकारणापुरतं आहे, अशाने देशाचं काही भलं होईल, असं वाटत नाही, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.

माझ्या हिंदुत्वाची काहीतरी व्याख्या आहे, पण भाजपच्या हिंदुत्वाची व्याख्या नेमकी काय आहे? माणिकराव कोकाटे, धनंजय मुंडे यांना जपणं म्हणजे भाजपाचं हिंदुत्व आहे का, असा सवालही त्यांनी केला.

चार वेळा आमदार केले, आठ मर्सिडीजच्या पावत्या द्या

नीलम गोऱ्हेंनी साहित्य संमेलनात केलेल्या आरोपाबाबत उत्तर देण्यास मात्र, ठाकरे यांनी नकार दिला. ती गयीगुजरी लोकं आहेत, मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही, असं ते म्हणाले. मात्र, त्यांच्या शेजारी बसलेल्या संजय राऊत यांनी, महिला आघाडीचा विरोध पत्करून नीलम गोऱ्हे यांना चार वेळा आमदार पद दिले, विधान परिषदेचे सभापती केले मग त्या चार आमदारकीच्या ज्या आठ मर्सिडीज दिल्यात त्याच्या पावत्या दाखवा, असे आव्हान दिले.

हेही वाचा – UNESCO : शिवनेरीसह 12 किल्ल्यांना जागतिक वारसा मिळणार, महाराष्ट्राचे शिष्टमंडळ पॅरिस दौऱ्यावर



Source link

Comments are closed.