मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; तेजस्वी घोसळकरांचा राजीनामा, पक्षाकडून मनधरणी करण्याचे प्रयत्
<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;">मुंबई: शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे कुटुंबासोबत चांगले संबंध असणाऱ्या नेत्याने पक्षाला रामराम ठोकला आहे. स्थानिक नेतृत्वावरील नाराजीतून राजीनामा दिले गेल्याची माहिती आहे. उत्तर मुंबईत शिवसेना ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरेंच्य शिवसेनेतील नेत्या तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना उबाठा नेते अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर आता त्यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी आता मोठा निर्णय घेतला आहे. फेसबुक लाईव्ह सुरु असताना अभिषेक घोसाळकर यांची मॉरीस नरोन्हाने हत्या केली होती. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना मोठा फटका बसला आहे.
स्थानिक विभाग प्रमुख आणि विभाग संघटक यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत तेजस्वी घोसाळकर यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. तेजस्वी घोसाळकर यांनी विभाग प्रमुख आणि विभाग संघटक यांच्याबद्दल अनेक वेळा नाराजी व्यक्त करून सुद्धा पक्षाकडून दखल न घेतल्यामुळे राजीनामा दिल्याची माहिती आहे. मात्र तेजस्वी घोसाळकर यांनी राजीनामा दिल्यानंतर मातोश्री वरून तेजस्वी यांना बोलवण्यात आला असून या सगळ्या संदर्भात माहिती घेतली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान माजी नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरे गटाच्या सर्व पदांचा तेजस्विनी घोसाळकरांनी राजीनामा दिला आहे.
तेजस्वी घोसाळकर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ नेते विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत. अभिषेक घोसाळकरच्या हत्येनंतर आता तेजस्वी घोसाळकर यांनी मोठे पाऊल उचलले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तेजस्वी घोसाळकर यांनी व्हॉट्सअॅपद्वारे विभागप्रमुखांकडे राजीनामा सादर केला आहे. दरम्यान, शिवसेनेचे वरिष्ठ नेते तेजस्वी घोसाळकर यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. सूत्रांनुसार तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये किंवा शिंदे गट शिवसेनेत प्रवेश करू शकतात. घोसाळकर कुटुंबाचे ठाकरे कुटुंबासोबत जवळचे संबंध आहेत. मात्र, स्थानिक नेतृत्वावर नाराज होऊन तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.
अभिषेक घोसळकर यांची गोळी झाडून हत्या
2024 च्या सुरुवातीला तेजस्वी घोसळकर यांचे पती अभिषेक घोसळकर यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. हा प्रकार मुंबईतल्या बोरीवली परिसरात घडला होता आणि त्यामुळे घोसळकर कुटुंब चर्चेत आले. तेजस्वी घोसाळकर यांचे सासरे विनोद घोसळकर हे मुंबईतील दहिसर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार राहिले आहेत.
राजीनामा देताना काय म्हणाल्या तेजस्वी घोसाळकर?
तेजस्वी घोसाळकर यांनी दिलेल्या राजीनाम्यात लिहलं आहे, मी तेजस्वी घोसाळकर महिला दहिसर विधानसभा प्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), या पदावरून वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत आहे. या पदावर कार्य करताना मला पक्षाच्या कार्यपद्धतीशी एकनिष्ठ राहून कार्य करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी पक्षप्रमुख व आपले मन:पूर्वक आभार मानते. माझा हा राजीनामा स्वीकारावा, ही नम्र विनंती.
तेजस्वी घोसाळकरांना जीवे मारण्याची धमकी
गेल्या महिन्यामध्ये तेजस्वी घोसाळकर यांना जीवे मारण्याची धमकी व्हॉट्सअप ग्रुपवर आलेली होती. तेजस्वी घोसाळकर यांच्या नावाने व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज शेअर करण्यात आला होता. ‘लालचंद इनको देखकर सुधर जा, इसकी बिवी को मत मरवा देना लालचंद’, अशा आशयाचा हा मेसेज होता.
Comments are closed.