Shivsena ubt mla kailas patil raised question on mukyamantri baliraja mofat vij yoajana said farmers get bill with dues in february in marathi
हे सरकार सत्तेत आल्यानंतर थकबाकीसह बिलं पाठवण्यात आल्याची माहिती ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी विधान सभेत दिली. सरकारच्या या निर्णयामुळे लाखो शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरकारने याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी कैलास पाटील यांनी केली.
Maharashtra Assembly Session 2025 : मुंबई : राज्यातील कृषी पंपधारक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आधीच्या महायुती सरकारने सुरू केली होती. मात्र, पुन्हा एकदा हे सरकार सत्तेत आल्यानंतर थकबाकीसह बिलं पाठवण्यात आल्याची माहिती ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी विधान सभेत दिली. सरकारच्या या निर्णयामुळे लाखो शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरकारने याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी कैलास पाटील यांनी केली. (shivsena ubt mla kailas patil raised question on mukyamantri baliraja mofat vij yoajana said farmers get bill with dues in february)
हा मुद्दा मांडताना कैलास पाटील यांनी महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांना शंभर टक्के फसवल्याचा आरोप केला. निवडणुकीपूर्वी सरकारने मते मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना खोटी आश्वासने दिली. खोटी बिले वाटली. विधानसभा निवडणुकीआधी शेतकऱ्यांना झिरो बिल दिले गेले होते. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो देखील आहेत. आपला मुद्दा मांडण्यासाठी कैलास पाटील यांनी एका शेतकऱ्याचे वीज बिल दाखवले. त्याला निवडणुकीपूर्वी झिरो बिल दिले होते. डिसेंबरचे जे बिल आले त्यात 1 लाख 12 हजारांच्या थकबाकीसह बिल देण्यात आल्याचा कैलास पाटील यांचा दावा आहे.
हेही वाचा – Shinde Vs Pawar : धुसफूस सुरूच, एनसीपीकडून ‘छावा’चा खास शो अन् शिंदे गटाची अनुपस्थिती
तुम्ही विधानसभेत घोषणा केली. निवडणुकीपूर्वी घरोघरी जाऊन बिले वाटली. आणि नंतर त्यांना थकबाकीची बिले येत असतील तर त्यांची भावना काय असेल, अशी विचारणा पाटील यांनी केली. प्रत्येक शेतकऱ्याला अशीच बिलं येत आहेत. याचं सरकारनं उत्तर द्यावं, असं कैलास पाटील म्हणाले. शेतकऱ्यांना चालू बिल माफ केले आहे की थकबाकीसह बिल माफ केले आहे, याची स्पष्टता मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजे. आणि थकबाकी जर माफ केली असेल तर ही बिले कशी येत आहेत, असा सवाल कैलास पाटील यांनी केली आहे.
निवडणुकीनंतर झिरो बिल ऐवजी शेतकऱ्यांच्या हातात थकबाकीसह वीज बिल देण्यात आले आहे. लाखो रुपयांचे थकित बिल अचानक आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात शेतकऱ्यांचे वीज बिल घेऊन मुद्दा मांडला. थकित वीज बिल न भरल्यास मागेल त्याला सौर पंप योजनेचा लाभ मिळणार नसल्याच शेतकऱ्याला सांगितले जात असल्याचे कैलास पाटील यांचे म्हणणे आहे.
अजित पवार काय म्हणाले होते?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकच्या एका कार्यक्रमात 2 ऑगस्ट 2024 ला माझ्या शेतकऱ्याला मोफत वीज मिळाली पाहिजे, असे म्हटले होते. साडे सात हॉर्सपॉवर पर्यंत मोफत वीज दिली. माझ्या शेतकऱ्यांनी वीज वापरावी, लाईट बिल द्यायचे नाही. विरोधक फेक राजकारण करत आहेत.आम्ही हे सगळं समाजाच्या भल्यासाठी करतोय, असंही ते म्हणाले होते. एवढी चांगली वीज माफीची योजना आणि विरोधक म्हणतात हा चुनावी जुमला आहे. पुढे पाच वर्ष वीज माफी नाही ठेवली तर पवारांची औलाद सांगायचो नाही, असं अजित पवार म्हणाले होते.
हेही वाचा – Assembly Session 2025 Live Update : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात
Comments are closed.