भाऊबंदकी संपली, आता एकीचा सूर्य उगवतोय, शिवशाही अवतणार आहे; संजय राऊत यांचा विश्वास
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आणि मिंध्यांवर चांगलाच हल्ला चढवला. तसेच भाऊबंदकी आणि सारखं छातीत दुखतंय या नाटकाचा उल्लेख करत करण्यात आलेल्या टीकेचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला. तसेच मिंधे आणि भाजपला आपल्या शैलीत जबरदस्त टोला लगावला.
सुरुवातीच्या काळात भाऊबंदकी नाटकाचे प्रयोग गाजत होते, आता मनोमिलनाचे प्रयोग सुरू आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले त्यावर मिंधे यांचे वाचन वाढले आहे, असे दिसते, असा टोला त्यांनी लगावला. तसेच भाऊबंदकी नाटकाचे लेखक कोणा आहेत? असा प्रश्न त्यांना विचारा. हे नाटक कोणत्या साली आले, ते त्यांनी पाहिले का? इतिहास काळातील भाऊबंदकी नष्ट झाल्यावर राज्यात शिवशाही अवतरली. कृष्णाची प्रभाकर खाडिलकर हे त्या नाटकाचे लेखक आहेत. त्यांनी या नाटकातून एक चित्र महाराष्ट्राल दाखवले, जोपर्यंत भाऊबंदकी राज्यात आहे, तोपर्यंत हे राज्य आपेल होणार नाही. मराठी लोकांनी एकत्र आले पाहिजे. त्यामुळे भाऊबंदीचा संदेश मिंध्यांना अस्वस्थ करणारा आहे. वाद संपले, मतभेद संपले, भाऊ एकत्र आले, कुटुंब एकत्र आले, पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले, आता भाऊबंदकी संपली आहे. राज्यात एकीचा नवा सूर्य उगवत आहे, शिवशाही अवतरत आहे. हाच भाऊबंदकी नाटकाचा संदेश आहे, असे त्यांनी सांगितले.
सारखं पोटात दुखतंय, या नाटकाचाही मिंध्यांनी उल्लेख केला आहे. काही लोकांच्या पोटात दुखत असल्याने आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला आहे, असे पत्रकारांनी विचारले असता, संजय राऊत म्हणाले, त्यांना नाटकाचे नावच माहिती नाही, सारखं छातीत दुखतंय, असे नाटकाचे नाव आहे. आज नरक चतुर्दशी आहे. नरकासुराचा जन्म गोहत्तीला झाला होता. नरकासुराचे मूळ स्थान गोहत्ती आहे. राज्यातले जे नकरासूर आहेत, जे गुवाहाटीला जाऊन नरकासुराची पुजा करतात, त्यांना अंगदुखी होणारच. आम्हाला काहीही त्रास नाही, पोटदुखी वैगरे काही नाही, आम्ही ठणठणीत आहोत. मात्र, आज नरकासूराची जयंती आहे. त्यामुळे मिंध्यांना कदाचित आज गुवाहाटीला जावे लागेल, आजच्या दिवशी नरकासूर गुवाहाटीतून उगम पावला. त्यातून मिंधे प्रेरणा घेत आहेत. पण त्या नरकासूराचा अंत झाला म्हणून आपण नरकासूर चिरडतो. त्याचप्रमाणे राज्यातील जनता या सर्व भ्रष्ट नरकासूरांना चिरडून टाकणार आहे. अमेरिकेत ट्रम्प यांच्या विरोधात नो किंग्ज आंदोलन सुरू आहे. आपल्या देशातही ते होणार आहे, असे संजय राऊत म्हणाले.
जे सरकार गुवाहाटीत रेड्यांचे बळी देऊन निर्माण झाले, त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? ज्या राज्यांचे मुख्यमंत्री किंवा ज्या राज्याचे पंतप्रधान विज्ञानापेक्षा तंत्र, मंत्र, यंत्र यावर विश्वास ठेवतात, त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? पंडित नेहरू यांनी देश विज्ञानाच्या क्षेत्रात पुढे नेला. मात्र, हे लोकं देशाला मागे खेचून जनतेला श्रद्धा, अंधश्रद्धा यात अडकवून ठेवत आहे.त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? 50 रेड्यांचे बळी देऊन हे सरकार सत्तेत आले आहेत. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? असा सवालही त्यांनी केला.
Comments are closed.