भाजपचे वडील युद्ध थांबवू शकतात, परंतु हिंदू-पाकिस्तानचा क्रिकेट सामना थांबवू शकत नाही; संजय रत यांची भिमतोला
भाजप सरकारने हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला परवानगी देणे म्हणजे प्रखर राष्ट्रभक्त म्हणवणाऱ्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी आहे. हिंदुस्थानी क्रिकेट संघालाही हा समाना खेळायचा नाही, त्यांच्यावर जय शहा यांचा दबाव आहे. हे निर्लज्ज सरकार आहे, त्यांना नैतिकता शिल्लक राहिलेली नाही, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला.
भाजप सरकारने हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला परवानगी देणे म्हणजे प्रखर राष्ट्रभक्त म्हणवणाऱ्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी आहे. पहलगाम हल्ल्यात 26 निरपराध नागिरकांचा बळी गेला. त्यांच्या पत्नींचे सिंदूर पुसले गेले. या घटनेनंतर पतंप्रधान मोदी यांनी छाती पिटण्याचा राजकीय कार्यक्रम केला होता, त्याचे काय झाले? असा संतप्त सवालही संजय राऊत यांनी केला.
भाजपचा राष्ट्रवाद आणि देशभक्ती हे ढोंग आहे. याआधाही अशा आंतरराष्ट्रीय सामन्यातून हिंदुस्थानने माघार घेतलेली आहे. मात्र, यावेळी जय शहा यांचे त्यात संबंध आहेत. भाजप आणि अमित शहा यांचेही त्यात संबंध आहेत. जय शहा सध्या दुबईतच आहेत. आजच्या समान्याला ते जाणार नसल्याचे सांगण्यात येत आहे, जणूकाही ते उपकारच करत आहेत. सामना त्यांनीच आयोजित केला आहे, तेच त्याचे प्रमुख आहेत. त्यांच्यासाठीच हा सामना खेळवण्यात येत आहे.
राष्ट्रभक्तीबाबत नरेंद्र मोदी आणि त्यांच्या अंधभक्तांना कोणतीही नैतिकता राहिलेली नाही. बीजेपी के पापा वॉर रुकवा सकते है, मगर हिंदुस्थान-पाकिस्तान का क्रिकेट मॅच नही रुकवा सकते, असा जबरदस्त टोलाही त्यांनी हाणला. रशिया युक्रेन युद्ध मोदी थांबवू शकतात, ट्रम्प यांच्या दबावामुळे हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धही थांबवू शकतात. मात्र, हिंदुस्थान पाकिस्तान क्रिकेट मॅच ते थांबवू शकत नाही. त्यांची नेमकी काय मजबुरी आहे? हा पैशांचा खेळ आहे, या पैशांच्या खेळात कोण कोण गुंतलेले आहेत? असा सवालही त्यांनी केला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घोषणा केलेल्या या आंदोलनाची व्याप्ती फक्त महाराष्ट्रापुरती नसून हा विचार आता देशभरात फोफावला आहे. दिल्लीत आम आदमी पक्षाकडूनही आंदोलन करण्यात आले. अनेकजण स्वतःहून आंदोलनात सहभागी होत आहेत. दिल्लीत ज्या हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मॅच दाखवली जाईल, त्यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन आपने केले आहे. जनतेनेचअशा देशद्रोही हॉटेल, रेस्टॉरंटची नावे सार्वजनिक करत पोहचवण्यात येतील. या मॅचची तिकीटे विकली जात नाही. मात्र, यात गॅमलिंग होणार आहे. दुबईत जय शहा बसले आहेत, मनी लॉडरिंग होणार, असा आरोपही त्यांनी केला.
पहलगाम हल्ल्यात बळी पडलेल्या शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐशन्या द्विवेदी यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहचत नाही काय? पंतप्रधान मोदी यांची अशी काय मजबुरी आहे की, त्यांना हिंदुस्थान पाकिस्तान क्रिकेट सामना खेळवावा लागत आहे. हिंदुस्थान पाकिस्तान सामन्याला जनतेचा विरोध होत आहे. यावरून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठीच काल मोदी यांनी मणिपूरचा दौरा केला. यामागे काही उदात्त हेतू नव्हता. मणिपूरच्या जनतेविषय प्रेम, प्रखर राष्ट्रवाद असे त्यात काहीही नाही. भाजपचा राष्ट्रवाद,हिंदुत्त्ववाद म्हणजे जगातील सर्वात मोठे ढोंग आहे.
या सामन्याला अनेक क्रिकेटपटूंनीही विरोध केला आहे. पण जे क्रिकेटपटू मैदानात खेळणार आहेत, त्यांना लाज वाटली पाहिजे. पहलगाम हल्ल्यात बळी पडलेल्या निरपराध नागरिकांच्या रक्ताची किंमत त्यांना या सामन्याचा मोबदला म्हणून मिळत आहे. त्यांना राष्ट्रभक्ती, राष्ट्रभक्ती नाही का? क्रिकेटपटू एक सामना खेळले नाही, एका सामन्यावर बहिष्कार टाकला तर काय मोठे आकाश कोसळणार होते? जय शहा त्यांना फासावर देणार होते काय? अमित शहा ईडी लावून तुरुंगात टाकणार होते? बीसीसीआय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व संघटना जय शहा यांच्या ताब्यात आहेत, एवढेच नाही तर जो आशिया चषक खेळवला जात आहे, ते आशियाई क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मोहसीन नक्वी आहेत. त्या मोहसीन नक्वीच्या हाताखाली सदस्य म्हणून भाजपतील महाराष्ट्रातले मंत्री आशिष शेलार काम करत आहेत. नौतिकतेचा विार करत त्यांनी त्या बोर्डाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची गरज होती. ही मॅच जय शहा रद्द करू शकत नव्हते, तर त्यांनी पदाचा राजीनामा देत दुबई सोडून मुंबईत येण्याची गरज होती. त्यांचे पपा अमित शहा देशाला, सर्वांना राष्ट्रभक्ती, राष्ट्रवाद शिकवणार? हिंदुहृदयसम्राट, बाळासाहेब ठाकरे यांचे ते दाखले देतात. मात्र, बाळासाहेब यांचे नाव घेण्याचा त्यांना अधिकार नाही. आज बाळासाहेब असते, तर हिंदुस्थान पाकिस्तान क्रिकेट मॅट झालीच नसती. अमित शहा त्यांच्या मुलाल देशभक्ती शकवू शकत नाही, ते जनतेला देशभक्तीबाबत सांगत आहेत.
देशाच्या जनतेच्या भावनेशी खेळण्याचे काम भाजप करत आहेत. या सामन्याचा निषेध म्हणून राज्यातील घराघरातून पंतप्रधान मोदी यांना सिंदूर पाठवण्यात येणार आहे. देशभरात या सामान्याचा विरोध आहे. त्यांना जनतेच्या भावना समजल्या पाहिजे. हिंदुस्थानी क्रिकेट संघालाही हा समाना खेळायचा नाही, त्यांच्यावर जय शहा यांचा दबाव आहे. हे निर्लज्ज सरकार आहे, त्यांना नैतिकता शिल्लक राहिलेली नाही. आपल्या क्रिकेट संघात राष्ट्रभक्ती असेल तर त्यांनी सामन्यावर बहिष्कार टाकावा. भारतीय क्रिकेट संघ देशासाठी खेळत आहे की जय शहा यांच्यासाठी खेळत आहे.
आजची मॅचचे फिक्सिंग झाले आहे. या मॅचमध्ये दीड लाख कोटींचे गॅमलिंग झाले आहे. जास्तीतजास्त सट्टेबाजी, जुगार गुजरात आणि मुंबईच्या काही भागातून झाला आहे. त्यात मोठ्या प्रमाणात भाजपचे नेते सहभागी आहेत.या सामन्यात सर्वात जास्त उलाढाला गुजरातमधून होत आहे. आजचा सामना मनी लॉडरिंगचे मोठे प्रकरण आहे. ईडी आणि अमित शहा हे जय शहा यांना नोटीस पाठवणार आहेत का? असा परखड सवालही त्यांनी केला आहे.
Comments are closed.