निवडणूक घोटाळ्याबाबत आता राज ठाकरे नवी माहिती उघड करत असतील, तर त्याकडे गांभीर्याने बघावे लागेल – संजय राऊत

निवडणूक आयोगाकडे मतदार यादीतील घोळ स्पष्ट करूनही त्यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने 1 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची रणनीती ठरवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची आज बैठक होत आहे. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली. या बैठकीत 1 तारखेला निघणाऱ्या मोर्चाची रणनीती ठरवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाकडे मतदार यादीतील घोळ स्पष्ट करूनही त्यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने 1 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची रणनीती ठरवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची आज बैठक होत आहे. या बैठकीत मोर्चाची रणनीती ठरवण्यात येणार आहे. या बैठकील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरेः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेप्रमुख राज ठाकरे, काँग्रेसचे नेते, शरद पवार यांच्या पक्षाचे नेते, डाव्या पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत मोर्चाचे नियोजन आणि मोर्चानंतर पुढे काय, याबाबत चर्चा होणार आहे. हा मोर्चा संपल्यावर पुढील रणनीतीची माहिती व्यासपीठावरून देण्यात येईल.

विधानसभा निवडणुकीनंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी जनतेची मते जातात कुठे किंवा जनतेने दिलेली मतं गेली कुठे? असा सावल केला होता. तोच आमचाही प्रश्न होता. या सर्व घोटाळ्याबाबत, मतदार यादी गोंधळाबाबत राज ठाकरे काही महत्त्वाची माहिती देणार असतील, तर निवडणूक आयोगाला त्याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी या एका मतदारसंघातील दुबार मतदान, बोगस मतदान याबाबत पर्दाफाश केला. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशभरातील मतदानयादी घोटाळ्याचा पर्दाफाश केला.आता राज ठाकरे त्यांच्या पद्धतीने काही नवी माहिती उघड करत असतील, तर त्याकडे गांभीर्याने बघावे लागेल, असे ते म्हणाले.

Comments are closed.