बच्चू कडू लढवय्ये नेते, सातबारा कोरा करण्यात त्यांना यश आल्यास स्वागतच करु; संजय राऊत यांची भूमिका

कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. याबाबत प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक होणार आहे. बच्चू कडू यांना शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यश आले तर त्यांचे स्वागतच करू, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले. तसेच राजकारण आणि क्रिकेट याबाबतही त्यांनी परखडपणे मते व्यक्त केली आहे.
शेतकरी आंदोलनाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी मुंबईत आंदोलन करून त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. बच्चू कडू लढवय्ये नेते आहेत. शेतकऱ्यांचा सातबार कोरा करण्यात बच्चू कडू यांना यश आले, तर आम्ही त्याचे स्वागतच करू. साताबारा कोरा करणे ही मागणी, संज्ञा आणि संकल्पना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आहे. साताबार कोराच्या मागणीसाठी आम्ही सातत्याने आवाज उठवत आहोत. संघर्ष करत आहोत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी कर्जमाफी केली होती. आताही तशीच कर्जमाफी करण्यात यावी, ही आमची सर्वांची भूमिका आहे.
आज क्रीडी क्षेत्रातही राजकारणी आणि राजकारण शिरले आहे. एकेकाळी मुंबईतले उत्तमोत्तम खेळाडू आणि प्रशिक्षक, क्रिकेटपटू आणि या क्षेत्रातले प्रशासक एमसीए बोर्डावर होते. मात्र, गेल्या काही काळात एमसीएचा जो व्यापार किंवा बिजनेस झाला आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपण या मैदानाबाहेरच्या खेळात सहभागी व्हावे, असे वाटते. भारतीय क्रिकेटला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम शरद पवार यांनी केले आहे. त्यानंतर अनेकांचे लक्ष एमसीए किंवा आयपीएल याकडे वळले. भाजप आणि एमसीए यांचा कधी संबंध आला नव्हता. तो गेल्या तीन-चार वर्षांपासून यायला लागला आहे. प्रत्येकाला क्रिकेच बोर्डावर जायचे आहे, त्यामुळे क्रिकेटचे काय कल्याण होणार आहे, ते माहिती नाही. आता एमसीए म्हणजे ऑल पार्टी बोर्ड झाले आहे.

Comments are closed.