महाराष्ट्रद्रोह्यांना पायघड्या घालणे, हेच भाजपचे धोरण; संजय राऊत यांचा घणाघात

आम्ही मराठी भाषेसाठी आग्रही आहोत आणि आग्रही राहणारच, अशी गर्जना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच गरज पडली तर मराठी भाषेसाठी आक्रमक होण्याचीही आमची तयारी आहे, तुम्हाला जे करायचे आहे, ते करा, अशा शब्दांत त्यांनी फडणवीस सरकरला सुनावले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात फडणवीस राहत आहेत, याचे त्यांनी भान ठेवावे, असेही संजय राऊत यांनी फडणवीस यांना सुनावले आहे.

मराठी भाषेसाठी आम्ही हिंसाचार करणार, काय उखडायचे आहे ते उखडा, असे आव्हानही त्यांनी दिले. हा महाराष्ट्र असून हे मराठी भाषिकांचे राज्य आहे, हे फडणवीसांनी लक्षात ठेवावे. चांद्यापासून बांद्यापर्यंत मराठी माणसांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रासासाठी आमच्या बापजाद्यांनी, 106 हुतात्म्यांनी बलिान दिले आहे. त्यांचे या राज्यासाठी काहीही योगदान नाही. ते राज्याचे तुकडे करणारे आहेत. आज ते मुख्यमंत्री आहेत म्हणून ते गप्प आहेत, मात्र, ज्यादिवशी त्यांचे मुख्यमंत्रीपद जाईल ,त्यावेळी तुम्ही वेगळा विदर्भ मागणार आहात, हे आम्हाला माहिती आहे.

मराठी भाषेसाठी प्रंसगी आक्रमक होण्याची वेळ आली तर आम्ही आक्रमक होणारच, तुमचा कायदा काय आहे, ते जनतेला माहिती आहे. तुम्ही काय मोरारजी देसाई होणार आहात? मराठीचा आग्रह धरतो म्हणून आमच्यावर गोळ्या झाडणार आहात का, होय आम्ही मराठीचा आग्रह धरत आहोत आणि आम्ही तो धरणारच. आम्ही गुजरातला जाऊन मराठीचा आग्रह धरत नाही. तुमच्या गुजरातमध्ये आधी हिंदीसक्ती करा आणि त्यानंतर महाराष्ट्रात लादा, असेही संजय राऊत यांनी ठणकावले.

राज ठाकरे यांच्या भाषणात महत्त्वाचा मुद्दा आहे. 20 लाख बिहारी आणि हिंदी भाषिकांना मारून हाकलून देणाऱ्या अल्पेश ठाकूरला त्यांनी आमदार केले. नरेंद्र मोदी, अमित शहा काय करत आहेत, ते आधी बघा. अमित शहा म्हणतात, मी आधी गुजराती आहे. त्याचप्रमाणे आम्ही आधी मराठी आहोत, हे फडणवीस यांनी समजून घेतले पाहिजे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हे फडणवीसांनी समजून घ्यावे.

दौंडमध्ये काल हिंसाचार झाला, ते अर्बन नलक्षवादी भाजपचेच होते. भाजपचे दोन नवहिंदुत्ववादी आमदार आले आणि हिंसाचार पेटवून निघून गेले. दोन आमदार येतात, हिंसाचार पेटवून जातोय, त्यावेळी त्यांचा जनसुरक्षा कायदा काय करतोय? भांडी घासतोय का कोणत्या कोठ्यावर नाचतोय? याचे उत्तर त्यांनी द्यावे. देवेंद्र फडणवीस हे फेल्यूअर, अपयशी मुख्यमंत्री आहेत. मोदींच्या फुग्यात हवा भरली आहे, तशीच हवा फडणवीस यांच्या फुग्यात आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे.

निशींकात दुबे यांचे ते स्वागत करणार आहेत. महाराष्ट्राच्या शत्रूंसाठी ते पायघड्या घालणारच आहेत. त्यांना महाराष्ट्रातल्या खासदारांची चिंता नाही. महाराष्ट्रवर, मराठी माणसावर थुंकणाऱ्यांची त्यांना जास्त चिंता आहे. भाजपवाले महाराष्ट्रद्रोह्यांची थुंकी चाटत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 6 तारखेला दिल्लीत येणार आहेत. त्या दौऱ्यात या सर्व विषयांवर चर्चा होणार आहे. 6,7 आणि 8 या तारखांना उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा आहे. 7 तारखेला इंडिया आघाडीची बैठक आहे. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली आहे. राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना या बैठकीसाठी निमंत्रित केले आहे. या बैठकीत या सर्व मुद्द्यांवर चर्चा होणार आहे, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

Comments are closed.