Shivsena UBT opposition leader of assembly Bhaskar Jadhav name confirm


मुंबई : महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून (3 मार्च) सुरुवात झाली आहे. अशामध्ये विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदावरून अनेक चर्चा रंगल्या होत्या. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे समोर आले होते. अखेर याबाबतीत एक मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समोर आले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे, आमदार आदित्य ठाकरे यांच्यासमवेत अनेक नेत्यांनी मंगळवारी (4 मार्च) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांना पत्र दिले आहे. (Shivsena UBT opposition leader of assembly Bhaskar Jadhav name confirm)

हेही वाचा : LOP In Maharashtra Assembly : विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा नवीन फॉर्म्युला, म्हणे – 

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेना ठाकरे गट दावा करणार असून तशा आशयाचे पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना देण्यात आले. यावेळी भास्कर जाधव हे विरोधी पक्षनेते असतील, असेदेखील यामध्ये नमूद करण्यात आले आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असलेले संख्याबळ हे महाविकास आघाडीतील एकही पक्षाकडे नाही. त्यामुळे आतापर्यंत विधानसभा विरोधी पक्षनेतेपदावरून अनेक दावे केले जात होते. मविआमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडे सर्वाधिक 20 जागा होत्या, त्यामुळे शिवसेना उबाठाने यावर दावा केला होता. अखेर पत्र दिल्यानंतर आता त्यावर अंतिम निर्णय हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, “गेले काही दिवस सातत्याने आम्हाला विचारले जात होते की, विरोधी पक्षनेतेपदावर आम्ही दावा सांगणार आहोत की नाही? आज शिवसेनेने विरोधी पक्षनेतेपदावर्ती दावा केला आहे. महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत आम्ही पुढची वाटचाल एकत्रच करणार आहोत. इतर काही गोष्टींवर आमची चर्चा सुरू आहे. विधानसभा अध्यक्षांकडे विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाची मागणी आम्ही केलेली आहे. त्यामुळे लवकरच लोकशाही मूल्यांचे पालन करून याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी आम्हाला खात्री आहे. आमची अपेक्षा आहे की, अर्थासंकल्प सादर होण्याआधी हा निर्णय होईल.” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.





Source link

Comments are closed.