सिंहासन खाली करो, ठाकरे आ रहे है….! संजय राऊत यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

मुंबईतील वरळी येथे विजय मेळावा साजरा करण्यात आला. या मेळाव्यातून मराठीची शक्ती आणि एकजूट दिसून आली. या मेळाव्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना खणखणीत इशारा दिला आहे. सिंहासन खाली करो, ठाकरे आ रहे है….! अशी गर्जनाच त्यांनी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज की जय! जय भवानी जय शिवाजी! कोण आला रे कोण आला, महाराष्ट्राचा वाघ आला! आवाज कुणाचा? मराठीचा!!! अशा गगनभेदी घोषणांनी आणि ढोल ताशांच्या आवाजाने मुंबईचा वरळी भाग दणाणून सोडला होता. हिंदी सक्तीवर मराठी जनांच्या शक्तीने मिळवलेल्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठी जनांची पाऊले मुंबईच्या दिशेने वळली. महाराष्ट्रातील विविध पक्षाचे नेते, मराठी साहित्यिक, मराठी कलाकार, विविध क्षेत्रांतील मराठी मान्यवरांनी कार्यक्रमास विशेष उपस्थिती लावली. या मेळाव्यानंतर संजय राऊत यांनी ट्विट करत सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे.

एक्सवर केलेल्या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी म्हटले आहे की, आज की ताजा खबर: सिंहासन खाली करो, ठाकरे आ रहे है….! जय महाराष्ट्र! या ट्विटसोबत त्यांनी या मेळाव्यातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा एकत्र फोटो शेअर केला आहे.

Comments are closed.