Shivsena UBT Uddhav Thackeray meetings with all shivsena ubt branches in Mumbai BMC Elections asj


मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत शिवसेना ठाकरे गटाकडून शिव सर्वेक्षण यात्रा सुरू करण्यात आली होती. यावेळी मुंबईतील 36 विधानसभा क्षेत्रांसाठी नेमणूक केलेल्या निरीक्षकांनी आपला अहवाल पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला. त्यानंतर आता जानेवारीपासून उद्धव ठाकरे मुंबईतील सर्व शाखांना भेट देणार असून शाखाप्रमुखांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान, 26 डिसेंबरपासून शिवसेना ठाकरे गटाच्या मातोश्रीवर बैठकांचे सत्र सुरू होणार आहे. (Shivsena UBT Uddhav Thackeray meetings with all shivsena ubt branches in Mumbai BMC Elections)

हेही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदवार्ता, डिसेंबरचा हप्ता नववर्षाआधीच मिळणार 

– Advertisement –

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यात महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. अशामध्ये आता सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून शिवसेना ठाकरे गटानेदेखील आता पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश आले होते. पण विधानसभा निवडणुकीत मविआला मोठा फटका बसला. पण आगामी महापालिका निवडणुकींमध्ये विधानसभेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी मविआचे नेते सावधगिरी बाळगणार आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ऍक्शनमोडमध्ये आले आहेत.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे नवीन वर्षात विधानसभेत झालेली हानी भरून काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. शाखाप्रमुखांशी चर्चा करून महापालिका निवडणूक स्वतंत्र लढवणार का? यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, 26 डिसेंबरपासून 29 डिसेंबरपर्यंत विधानसभा निहाय बैठका होणार आहेत. उद्धव ठाकरे स्वतः बैठकीच्या माध्यमातून आढावा घेणार आहेत. 21 डिसेंबरला मुंबईतील निरीक्षकांची बैठक पार पडली होती. त्यानंतर आता पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात येणार आहे.

– Advertisement –

पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये मुंबई महानगर पालिका स्वबळावर लढावी, असे त्यांचे म्हणणे आहे. यासाठी उद्धव ठाकरे स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. या बैठकीसाठी विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बैठकीत महानगरपालिकेच्या तयारीचा आढावा तसेच जानेवारी महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या शाखा भेटीचे आयोजन करण्यासंदर्भात देखील चर्चा करण्यात येणार आहे.


Edited by Abhijeet Jadhav



Source link

Comments are closed.