Shivsena uddhav thackeray five mps join shinde shivsena but two mps not like join party then stop operation tiger


मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीत सत्तेत आल्यापासून ठाकरेंच्या पक्षाला पोखरण्याचे काम शिंदेंच्या शिवसेनेने हाती घेतले आहे. त्यापार्श्वभूमीवर ‘ऑपरेशन टायगर’ हे राबवण्यात येत असून अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी आमदारांना पक्षात सामील करून घेतले जात आहे. ठाकरेंचे खासदार फोडण्याची तयारी सुद्धा शिंदे गटाने केली होती. परंतु, दोन खासदारांमुळे ‘ऑपरेशन टायगर’ बारगळले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे.

नरेंद्र मोदी यांच्या सरकारला चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या आधारावर उभे राहावे लागत आहे. त्यामुळे स्थिर सरकारसाठी शरद पवार, उद्धव ठाकरे यांचे खासदार फोडण्याचे प्रयत्न अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून सुरू आहेत.

हेही वाचा : संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून एकनाथ शिंदे चिडले; म्हणाले, ‘चारीमुंड्या चित केलेय, तरीही…’

अजितदादा पवार यांच्याकडून शरद पवार यांचे खासदार फोडण्याचे प्रयत्न झाले होते. पण, खासदारांनी सुप्रिया सुळे यांना माहिती दिल्यावर त्यांनी थेट प्रफुल्ल पटेल यांना फोन करून नाराजी व्यक्त केली होती. यातच शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाकरेंचे खासदार फोडण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 खासदार निवडून आले आहेत. यातील सात खासदार फोडण्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा प्रयत्न होता. त्यातील पाच खासदारांनी ‘ग्रीन सिग्नल’ दाखवला होता. परंतु, दोन खासदारांनी ‘रेड सिग्नल’ दाखवल्याने ‘ऑपरेशन टायगर’ बारगळले. हे दोन खासदारांमधील एक उत्तर महाराष्ट्र आणि एक मराठवाड्यातील असल्याचे बोलले जात आहे.

ठाकरेंचे खासदार फुटत नसल्याचे पाहून खासदारांची ‘ऑपरेशन टायगर’ ही मोहिम थांबवण्यात आली आहे. परंतु, योग्यवेळी ही मोहिम सुरू करण्यात येणार आहे, अस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. ठाकरेंचे खासदार फुटले असते, तर चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्यावर असलेले भाजप अवलंबून राहावे लागले नसते.

दरम्यान, मागील आठवड्यात ठाकरेंचे सहा खासदार फुटणार असल्याचा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला होता. यानंतर ठाकरेंच्या खासदारांनी तडकाफडकी पत्रकार परिषद घेत हा दावा खोडून काढलेला.

“ज्यांचे सरकारमध्ये त्रांगडे सुरू आहे, वाद सुरू आहेत; या सगळ्याकडून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी प्रयत्न केला जातोय. ज्यांच्या पायाखालची वाळू सरकलीय, एकमत नाही, विसंवाद सुरू आहे, अनेक मंत्री गटांगळ्या खात आहेत, यासाठी कुणीतरी पुडी सोडली आहे,” असं अरविंद सावंत यांनी म्हटले होते.

हेही वाचा : शिंदेंचा सत्कार अन् राऊतांची पवारांवर आगपाखड, आता रोहित पवारांनी भाजपला ओढले वादात; म्हणाले…



Source link

Comments are closed.