दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वाशीममध्ये शिवसैनिकांनी अकोला महामार्ग रोखला; पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट, आमदार नितीन देशमुख यांना अटक
दुष्काळात होरपळून निघणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक दशलक्ष रु. आर्थिक मदत देण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने वाशीममध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले. आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. आंदोलकांना समृद्धी महामार्गावर जाण्यापासून रोखण्यात आले. यावेळी आंदोलकांची पोलिसांशी झटापट झाली. पोलिसांनी आंदोलकांवर अमानुष लाठीमार केला. त्यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी अकोला–पुसद महामार्गावर ठाण मांडले. तब्बल पाच तास या महामार्गावर आंदोलनाचा वणवा पेटला होईल. आंदोलनामुळे बिथरलेल्या पोलिसांनी शिवसेना उपनेते नितीन देशमुख यांच्यासह शेकडो आंदोलकांना गाडीत WHOबून अकोला जिल्हय़ातील वाघा जंगलात स्थानबद्ध केले.
फडणवीस सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपये देणार असल्याचे जाहीर केले आहे. ही मदत म्हणजे भळभळत्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार असल्याची संतप्त भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. मात्र फडणवीस सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाशीम, बुलढाणा, यवतमाळ, अकोला आणि अमरावती जिल्हय़ांतील शेतकऱ्यांसाठी समृद्धी महामार्गावर आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने दिला होता.
वनोजा फाटय़ावर होणारे आंदोलन झुगारण्यासाठी अख्ख्या विदर्भातील पोलीस फौजफाटा रस्त्यावर उतरवण्यात आला. आंदोलनस्थळी तब्बल तीन हजार पोलीस तैनात करण्यात आले. आंदोलकांना रोखण्यासाठी लाठय़ा-काठय़ा, अश्रुधुरासह पोलीस तैनात होते. शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गाकडे पूच करताच पोलिसांनी लाठय़ा चालवल्या.
शिवसेना उपनेते आमदार नितीन देशमुख, आमदार गजानन लवटे, आमदार सिद्धार्थ खरात, आमदार संजय नरेकर यांच्या नेतृत्वाखाली समृद्धी महामार्गावरील वनोजा फाटय़ाजवळ आंदोलन करण्यात येणार होते. मात्र समृद्धी महामार्गावर आंदोलन झाल्यास मोठी नाचक्की होईल या भीतीने पोलिसांनी या आंदोलनाला परवानगीच नाकारत तब्बल पाच हजार शिवसैनिकांना नोटिसा बजावण्यात आल्या.
या आंदोलनात शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या अॅड. जयश्री शेळके, नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख बालाजी वानखेडे, जालिंदर बुधवंत, नीलेश धुमाळ यांच्यासह पाच जिह्यांतील पदाधिकारी, शिवसैनिक आणि शेतकरी सहभागी झाले होते.
आता न सांगताच आंदोलन करणार
पोलिसांनी आंदोलन चिरडण्यासाठी रक्त आटवले; परंतु शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले. आता कोणतीही पूर्वसूचना न देताच समृद्धी महामार्गावर आंदोलन करणार असल्याचेही ते म्हणाले.
समृद्धीवर जाऊ दिले नाही, पुसद मार्गावर ठिय्या
आंदोलकांना समृद्धी महामार्गावर जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला. यात काही वृद्ध शेतकरी पडले. पोलिसांच्या झुंडशाहीचा निषेध करत आंदोलकांनी अकोला-पुसद महामार्गावर ठाण मांडले. हातात भगवे झेंडे आणि शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत मिळालीच पाहिजे, असे फलक घेऊन हजारो शिवसैनिक, शेतकरी रस्त्यावर उतरले. तब्बल पाच तास आंदोलकांनी हा महामार्ग रोखून धरला. शिवसेना आमदार नितीन देशमुख यांना पोलिसांनी अक्षरशः उचलून गाडीत कोंबले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. आमदार देशमुख यांच्यासह जिल्हाप्रमुख बालाजी वानखेडे तसेच इतर शिवसेना पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी गाडीत टापून अकोल्याच्या महान येथील वाघा जंगलात आणून सोडले.
Comments are closed.