अडाणी मॅनेजमेंट! पाकिस्तान टी20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्याने दिग्गजाने व्यक्त केली नाराजी

पाकिस्तान क्रिकेट संघ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मधून बाहेर झाला आहे. शनिवारी (२८ फेब्रुवारी) पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सुपर-८चा सामना खेळला गेला. त्यामध्ये पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्याच्या दृष्टीने मोठ्या फरकाने विजय आवश्यक होता, मात्र त्यांनी तो सामना केवळ ५ धावांनी जिंकला. या निकालामुळे न्यूझीलंडने उपांत्य फेरीत प्रवेश केला. पाकिस्तान सलग चौथ्यांदा आयसीसी स्पर्धांमध्ये खराब कामगिरी करत असल्याने दिग्गजांनी निराशा दर्शवली आहे.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने टॅपमॅडमध्ये बोलताना संघ व्यवस्थापन आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डची चांगलीच शाळा घेतली आहे.
“या स्पर्धेत पाकिस्तानचे संघ व्यवस्थापन काय करत होते, हे त्यांनाही माहित नव्हते. ते एकदन क्लूलेस दिसले. श्रीलंकेविरुद्धचा निकाल पाहता मागील १५ दिवसांपासून खेळवण्यात आलेल्या अंतिम अकरा खेळाडूंची निवड चुकली असे दिसते. यामध्ये सर्वात मोठी चूक ख्वाजा नफेच्या जागी सईम आयूबला खेळवले पाहिजे होते, त्यामुळे त्याची गोलंदाजीत मदत झाली असती,” असे अख्तरने म्हटले आहे.
खेळाडूंबरोबर संघ व्यवस्थापनाबाबत बोलताना त्याने थेट पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर निशाना साधला आहे. त्याने म्हटले, “खेळाडूंना त्यांच्या बरोबर जागी खेळवले पाहिजे. तसे की फखर जमान हा नैसर्गिकपणे उत्तम सलामीवीर आहे. अबरार अहमद सारख्या खेळाडूला दुर्लक्ष करणे हे चुकीचे आहे. नक्वी हे क्रिकेटचे विशेषज्ञ नाहीत, मात्र त्यांना योग्य सल्ले मिळत होते का?”
लागोपाठ चार आयसीसी स्पर्धांच्या सुपर-८ किंवा साखळी फेरीतून बाहेर पडल्याने हा क्षण पाकिस्तान क्रिकेटच्या इतिहासातील अतिशय वाईट क्षण किंवा काळ ठरला आहे. या स्पर्धेत पाकिस्तानचे नेतृत्व सलमान अली आगाने केले होते. त्याच्यावरही प्रश्न उपस्थित होत असून त्याचे कर्णधारपदही जाण्याची शंका आता निर्माण झाली आहे.
सलमानचे नेतृत्व म्हणावे तसे खास राहिले नाही. त्याच्या नेतृत्वात तर पाकिस्तानने भारताविरुद्ध मागील चार सामने गमावले आहे. त्यामध्ये एशिया कपचे तीन आणि आता टी२० विश्वचषक २०२६चा एका सामन्याचा समावेश आहे.
Comments are closed.