अरे, तुझ्या 23 धावांची गरज नाही…; शोएब अख्तर शाहीन आफ्रिदीला काय काय म्हणाला?
भारत विरुद्ध पाक T20 विश्वचषक 2026 वर शोएब अख्तर: टी-20 विश्वचषकामधील (T20 World Cup 2026) भारत विरुद्ध पाकिस्तानच्या (Ind vs Pak) सामन्यात भारतीय संघाने उल्लेखनीय कामगिरी करत पाकिस्तानला 61 धावांनी पराभूत केले. या विजयासह भारताने सुपर-8 मधील स्थानही निश्चित केले.
श्रीलंकेतील कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 175 धावा केल्या, परंतु पाकिस्तानला प्रत्युत्तरात फक्त 114 धावाच करता आल्या. 40 चेंडूत 77 धावा करणाऱ्या इशान किशनला (Ishan Kishan) सामनावीर म्हणून निवडण्यात आले. दरम्यान, भारतविरुद्ध पुन्हा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू शोएब अख्तरने पाकिस्तान संघावर टीका केली. तसेच पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीलाही शोएब अख्तरने सुनावले. (Team India T20 World Cup 2026)
शोएब अख्तर ऑन शाहीन आफ्रिदी- (शोएब अख्तर शाहीन आफ्रिदीवर)
पाकिस्तानकडून फलंदाजी करताना शाहीन आफ्रिदीने आक्रमक अशी 23 धावांची खेळी केली. यामध्ये शाहीन आफ्रिदीने 2 चौकार आणि 1 षटकार टोलावला. मात्र या खेळीनंतरही शोएब अख्तरने शाहीन आफ्रिदीला सुनावले. एबीपी न्यूजशी बोलताना शोएब अख्तर म्हणाला की, अरे आम्हाला तुझ्या 23 धावांची गरज नाही. तुझ्याकडून विकेटची गरज आहे.
#BREAKING | 'भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यासाठी आला आहे' – शोएब अख्तर@romanaisarkhan | @मोहम्मदकैफ https://t.co/smwhXUROiK#ABPNews #T20WorldCup2026 #IndVsPak #इशानकिशन #मोहम्मदकैफ pic.twitter.com/MWKhccwtzK
— एबीपी न्यूज (@ABPNews) 15 फेब्रुवारी 2026
भारत विरुद्ध पाक T20 विश्वचषक 2026 वर शोएब अख्तर
शोएब अख्तर पुढे म्हणाला की, पाकिस्तान कोणत्याही प्रकारे आधुनिक क्रिकेट खेळत नाही. भारत पुढील 100 वर्षांचे क्रिकेट खेळत आहे किंवा पुढील 50 वर्षांचे क्रिकेट आता खेळत आहे. पाकिस्तान खूप वाईट क्रिकेट खेळत आहे आणि जेव्हा या फॉरमॅटचा (टी-20 आंतरराष्ट्रीय) विचार केला जातो तेव्हा ते खूप मागे आहेत, हे वारंवार स्पष्ट होतंय, असं शोएब अख्तरने सांगितले.
भारत अव्वल स्थानावर- (T20 World Cup Points Table)
सलग तीन सामने जिंकल्यानंतर भारताने आता ए ग्रुपमध्ये सहा गुणांसह पहिले स्थान मिळवले आहे. या पराभवानंतर पाकिस्तानचा मार्ग अधिक कठीण झाला आहे, ज्यामुळे ते तिसऱ्या स्थानावर घसरले आहेत. चांगल्या नेट रनरेटमुळे अमेरिका आता दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे.
The Unfolding
कच्चा. वास्तविक. कोलंबो.#TeamIndia 🇮🇳 | #T20WorldCup | #मेनइनब्लू https://t.co/W7hftULm21
— BCCI (@BCCI) १६ फेब्रुवारी २०२६
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.