युद्धानंतर…भारतविरुद्धच्या सामन्याआधी शोएब अख्तरचा पाकिस्तानला सल्ला; मनातलं सगळं सांगून टाकल
शोएब अख्तर इंड. वि पाक एशिया कप 2025: आशिया कपमध्ये (Asia Cup 2025) आज दुबईत भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात हायव्होलटेज क्रिकेट सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार आज रात्री 8 वाजता सामना सुरू होईल. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध अलीकडेच बिघडले आहेत. त्यामुळे या सामन्याची हजारो तिकिटे अजूनही विक्रीविना उपलब्ध असल्याची माहिती आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत एक-एक सामना जिंकल्याने आजचा सामना कोण जिंकणार याकडे लक्ष लागल्या.
भारतविरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) प्रतिक्रिया दिली आहे. भारत पाकिस्तानला सहज पराभूत करु शकतो, असं शोएब अख्तरने सांगितले. एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीवर चर्चा करताना शोएब अख्तर म्हणाला की, युद्धानंतर हा पहिला भारत-पाकिस्तान सामना असेल. भावना खूप तीव्र आहेत. त्यामुळे भावना शिगेला पोहोचल्या आहेत, असंही शोएब अख्तरने सांगितले.
शोएब अख्तरचा पाकिस्तानला सल्ला-
भारताला हरवणे खूप कठीण आहे, असंही शोएब अख्तरनेही कबूल केले. भारतीय संघ प्रत्येक क्षणी पाकिस्तानला पराभूत करण्याचा प्रयत्न करेल यात शंका नाही. पाकिस्तान संघाने पहिल्या 4 षटकांमध्ये टीम इंडियावर दबाव आणण्याचा प्रयत्न करावा लागेल. हसन अली आणि शाहीन आफ्रिदी यांनी आक्रमक गोलंदाजी करावी, असंही शोएब अख्तरने सांगितले.
भारताचा संपूर्ण संघ (India Full Squad): सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, हर्षित राणा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक)
पाकिस्तानचा संपूर्ण संघ (Pakistan Full Squad): सलमान आगा (कर्नाधर), अबरार अहमद, फहीम अशरफ, फखर झमान, हरीस राउफ, हसन अली, हसन नवाझ, हुसेन तालत, खुशदिल शाह, मोहम्मद हरीस (यशक), मोहम्मद नवाज, मोहम्मद नवाज, शमनसुब, शीबहाद अफरीदी, सुफन शाह शाह.
https://www.youtube.com/watch?v=FSFHM8EXNFQ
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.