शोएब अख्तर यांचा थेट कार्यक्रमात राग अनावर, माजी क्रिकेटपटू आश्चर्यचकित

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा अंतिम सामना रविवारी (9 मार्च) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरती खेळवला जाणार आहे. पाकिस्तानने 29 वर्षांनंतर आयसीसी स्पर्धेचे आयोजन केले. यजमान असूनही पाकिस्तान संघ गट टप्प्यातच बाहेर पडेल असे कोणाला वाटले असेल. एकीकडे भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना आधीच निश्चित झाला आहे, तर दुसरीकडे पाकिस्तान आता अडचणीत आहे. माजी कर्णधार मोहम्मद हाफिजनेही पाकिस्तान संघाच्या खराब कामगिरीबद्दल अनुभवी खेळाडूंवर टीका केली आहे. त्यांचे मत आहे की, पाकिस्तान क्रिकेटची सध्या अशी स्थिती आहे कारण माजी क्रिकेटपटू तरुणांना प्रोत्साहन देण्यात अपयशी ठरले आहेत.

‘आउटसाइड एज लाईव्ह शो’ या पाकिस्तानी कार्यक्रमात मोहम्मद हाफिज म्हणाले की, 1990 च्या दशकात खेळणाऱ्या महान क्रिकेटपटूंनी पाकिस्तान क्रिकेटला काहीही दिले नाही. तो म्हणाला, “मी 1990 च्या दशकात खेळणाऱ्या खेळाडूंचा खूप मोठा चाहता आहे. पण जेव्हा त्यांच्या वारशाचा विचार केला जातो तेव्हा त्यांनी पाकिस्तानला काहीही दिले नाही. त्यांनी आयसीसीची कोणतीही स्पर्धा जिंकली नाही. त्यांनी 1996, 1999आणि 2003 मध्ये विश्वचषक गमावला. आम्ही 1999 च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचलो, पण वाईट पराभव पत्करला.”

1990 च्या दशकात खेळणाऱ्या महान खेळाडूंवर मोहम्मद हाफीज टीका करत असताना शोएब अख्तरही चर्चेत उपस्थित होता. शोएब अख्तरने हाफीजच्या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “जेव्हा 73 वेळा पाकिस्तानने भारताला एकदिवसीय सामन्यांमध्ये हरवले, त्याच फेरीत ते स्वतः खेळत होते.” हाफीजने मध्येच बोलताना इम्रान खानच्या नेतृत्वाचे कौतुक करण्याचा प्रयत्न केला, परंतु शोएब अख्तरने विनोदाने हाफीजला टोमणे मारले की, “आता तुम्ही तुमचे शब्द लपवू शकत नाही, हा व्हिडिओ आधीच रेकॉर्ड झाला आहे आणि तुम्ही 1990 च्या दशकातील सर्व मोठ्या खेळाडूंना लक्ष्य केले आहे.”

महत्वाच्या बातम्या :

विराट कोहली सचिनच्या पावलावर! आतापर्यंत खेळले इतके ICC वनडे फायनल्स

“सेमीफायनलमध्ये ड्रेसिंग रूममध्ये तणाव, पण हार्दिक हसत होता”, अक्षर पटेलनं सांगतली आतली गोष्ट

भारतीय संघ न्यूझीलंडकडून 25 वर्षांपूर्वीच्या पराभवाचा बदला घेऊ शकेल का?

Comments are closed.