चिमुरडीवर ऑसिड हल्ला; संगमनेर तालुका हादरला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

तालुक्यातील वडगाव पान शिवार येथील हाडकी ओढा परिसरात 13 वर्षीय शाळकरी चिमुरडीवर अज्ञात तरुणाने ऑसिड हल्ला केल्याची संतापजनक घटना आज उघडकीस आली.

अल्पवयीन मुलगी आज शाळेतून घरी जात असताना सकाळी 11च्या सुमारास वडगाव पान शिवारातील हाडकी ओढा परिसरात दुचाकीवरून आलेल्या तरुणाने पत्ता विचारण्याचा बहाणा करीत मुलीवर ऑसिड हल्ला करून तो पसार झाला. घटनेनंतर नागरिकांनी तिला तातडीने लोणी येथील प्रवरा मेडिकल रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे.

Comments are closed.