T20 WC 2026: ऑस्ट्रेलियाला नडलं ‘ते’ कृत्य! पाहा आता सुपर-8 मध्ये भारताचे सामने कोणाविरुद्ध

ऑस्ट्रेलियाचा संघ आयसीसी टी20 विश्वचषक 2026 (Icc T20 international world cup 2026) च्या पहिल्याच फेरीतून बाहेर पडला आहे. जेव्हा ऑस्ट्रेलियाला झिम्बाब्वेविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता, तेव्हाच त्यांच्या बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. उरली-सुरली कसर आज पूर्ण झाली.
आज श्रीलंकेतील पल्लेकेले येथे झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यात सामना होणार होता. मात्र, पावसामुळे हा सामना रद्द झाला. या दोन संघांचा सामना होऊ शकला नाही, पण त्याचा सर्वात मोठा फटका ऑस्ट्रेलियाला बसला आणि त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
ऑस्ट्रेलियाच्या या पराभवानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा 2023 च्या वनडे विश्वचषकातील त्या फोटोची चर्चा रंगली आहे. 2023 मध्ये जेव्हा ऑस्ट्रेलियाने भारताला फायनलमध्ये हरवून विश्वचषक जिंकला होता, तेव्हा मिचेल मार्शचा एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्याने विश्वचषक ट्रॉफीवर पाय ठेवले होते. तेव्हा या कृत्यावर मोठी टीका झाली होती. भारताने जेव्हा जेव्हा विश्वचषक जिंकला, तेव्हा ट्रॉफीला मानाने छातीशी लावले, पण मार्शच्या त्या कृतीमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या होत्या. योगायोगाने, आज त्याच मिचेल मार्शच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्याच फेरीत स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
ऑस्ट्रेलियाचा शेवटचा सामना 20 फेब्रुवारीला ओमानविरुद्ध होणार आहे, पण आता या सामन्याला काहीही महत्त्व उरलेले नाही, कारण दोन्ही संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. ऑस्ट्रेलिया बाहेर पडल्यामुळे झिम्बाब्वेचा संघ सुपर-8 मध्ये पात्र ठरला आहे. जर पाकिस्तानने त्यांचा पुढचा सामना जिंकला, तर ते देखील सुपर-8 मध्ये पोहोचू शकतात.
सुपर-8 मध्ये भारताचे वेळापत्रक:
ऑस्ट्रेलिया बाहेर पडल्यामुळे आता भारताचा सामना दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांच्याशी होणार आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका: अहमदाबाद
भारत विरुद्ध झिम्बाब्वे: चेन्नई
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज: कोलकाता
Comments are closed.