धक्कादायक! परफ्यूमवरील तारखा बदलताना बाटल्यांचा स्फोट; पती-पत्नीसह 4 जण जखमी

पालघर : नालासोपारा पूर्वेच्या शंकेश्वरनगर मधील एका इमारतीत परफ्युमवरील (Perfume) तारखा बदलण्याचे काम सुरू असताना अचानक स्फोट झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास ही घटना घडली यात एकाच कुटुंबातील चार जण होरपळून जखमी झाले आहेत. मात्र, परफ्युमच्या बाटल्यांचा असा स्फोट झाल्याने शेजारील नागरिकही भयभीत झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, या घटनेचा तपास केला जात असून नेमकं स्फोट होण्याचं कारण शोधण्यात येत आहे.

नालासोपारा पूर्वेच्या शंकेश्वर नगर परीसरात ही घटना घडली आहे. या ठिकाणी असलेल्या रोशनी अपार्टमेंट इमारतीत मधील 112 क्रमांच्या सदनिकेत वडर कुटुंब राहते. गुरुवारी रात्रीच्या सुमारास परफ्युम बॉटलवरील तारखा संपल्या होत्या. त्या बदलण्याचे काम सुरू होते. याच दरम्यान अचानकपणे स्फोट झाला. परफ्युम मध्ये असलेल्या गॅसमुळे स्फोटात घरातील चार जण होरपळून जखमी झाले आहेत. यात महावीर वडर (41), सुनीता वडर,  हर्षवर्धन वडर (9), हर्षदा वडर(14) अशी जखमींची नावे आहे. या दुर्घटनेत पती-पत्नीसह कुटुंबातील दोन मुले असे एकूण 4 जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती पालिकेच्या अग्निशमन विभागाला मिळताच घटनास्थळी पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणली. तर जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. मुलगा हर्षवर्धन याच्यावर नालासोपारा येथील लाईफ केयर रुग्णालय तर अन्य 3 जणांवर ओस्कर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा

तळघरातून बारबाला बाहेर पडतानाचा व्हिडीओ व्हायरल, आदित्य ठाकरेंच्या मालकीचा कॅफे असल्याचा दावा, सेनेची तक्रार

अधिक पाहा..

Comments are closed.