आयपीएल 2026 पूर्वी KKR चा मोठा निर्णय! मेगा लिलावाआधी या 5 खेळाडूंना रिलीज करणार?

आयपीएल 2026 चा मेगा लिलाव विशेष करून कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. गेल्या हंगामात KKR च्या कर्णधारपदावरून बरीच चर्चा झाली होती. शेवटी संघाने अजिंक्य रहाणेवर (Ajinkya Rahane) कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली होती. मात्र, त्यावेळी KKR पॉईंट्स टेबलमध्ये आठव्या स्थानावर राहिली.

आता ऑक्शनपूर्वी वेंकटेश अय्यरला रिलीज करण्याच्या चर्चा जोरात सुरू आहेत. कारण जर त्याला सोडले, तर KKR च्या पर्समध्ये तब्बल ₹23.75 कोटींची रक्कम मोकळी होईल, ज्यामुळे संघाला मजबूत टीम बनवायला मोठी मदत मिळेल.

व्यंकटेश अय्यर

KKR सर्वात पहिले नाव म्हणून वेंकटेश अय्यरला सोडू शकते. कारण त्याच्या जाण्याने 23.75 कोटी रुपये कामी येतील, जे ऑक्शनमध्ये संघाला कामी येतील.
गेल्या हंगामात एवढी मोठी रक्कम मिळूनही अय्यर फक्त 11 सामन्यांत 142 धावाच करू शकला होता.

मोईन अली

गेल्या वर्षी मेगा लिलावामध्ये KKR ने मोईन अलीला (Moin Ali) 2 कोटींमध्ये विकत घेतले होते. पण त्याने 5 सामन्यांत केवळ 6 धावा केल्या आणि 6 विकेट्स घेतल्या. त्याच्या निराशाजनक प्रदर्शनामुळे KKR त्याला रिलीज करून दुसरा अष्टपैलू खेळाडू घेण्याचा विचार करू शकते.

स्पेन्सर जॉन्सन

वेगवान आणि घातक गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला स्पेन्सर जॉन्सन IPL मध्ये अपेक्षेप्रमाणे चमक दाखवू शकला नाही. KKR ने त्याला ₹2.8 कोटींमध्ये घेतले होते, पण त्याने 4 सामन्यांत फक्त 1 विकेट घेतली. त्यामुळे त्यालाही संघातून बाहेर जाण्याची शक्यता आहे.

एनरिक नॉर्टजे

एन्रिक नॉर्टजे मागील दोन-तीन हंगामांपासून सातत्यपूर्ण प्रदर्शन करण्यात अपयशी ठरला आहे.
गेल्या दोन हंगामात त्याने 8 सामन्यांत फक्त 8 विकेट्स घेतल्या, तर 2025 मध्ये KKR साठी फक्त 2 सामन्यांत 1 विकेट मिळवली.
त्याचा इकॉनॉमी रेट 11.86 होता, जो खूपच जास्त मानला जातो.

मनीष पांडे

मनीष पांडे हा IPL मध्ये 2008 पासून सातत्याने खेळणारा अनुभवी खेळाडू आहे. मेगा लिलावामध्ये KKR ने त्याला ₹75 लाखांमध्ये घेतले होते. पण संपूर्ण हंगामात त्याला फक्त 3 सामने खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने एकूण 92 धावा केल्या. त्यामुळे त्यालाही रिलीज करण्याची शक्यता आहे.

Comments are closed.