भारतीय संघाला मिळणार दुसरा वीरेंद्र सहवाग? दिग्गज क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी!
भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) धाकड फलंदाजीसाठी ओळखले जातात. भारताचा ह्या दिग्गज खेळाडूने 20 ऑक्टोबर 2015 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. सेहवागच्या निवृत्तीनंतर 10 वर्षांनी टीम इंडियाला वीरेंद्र सेहवागसारखा आणखी एक खेळाडू मिळाला आहे. या बाबतीत दावा भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू नवजोत सिंग सिद्धूंनी (Navjyot Singh Siddhu) केला आहे. सिद्धूंनी भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामन्यानंतर व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली.
माजी भारतीय क्रिकेटपटू नवजोत सिंग सिद्धूंनी व्हिडिओत अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आणि शुबमन गिलबद्दल (Shubman gill) सांगितले की, मला या दोन पंजाबी खेळाडूंना सर्व फॉरमॅटमध्ये ओपनिंग करताना पाहायला आवडेल. जर अभिषेक शर्माला सर्व फॉरमॅटमध्ये खेळवले गेले, तर भारताला दुसरा वीरेंद्र सेहवाग मिळू शकतो.
सिद्धूंनी पुढे सांगितले की, अभिषेकला सर्व फॉरमॅटमध्ये खेळवायला तयार करायला हवे. जेव्हा तुम्ही त्याला सर्व फॉरमॅटमध्ये खेळवायला सुरुवात कराल, तेव्हा जन्मेल दुसरा वीरेंद्र सेहवाग. सिद्धू पुढे म्हणाले की, शुबमन गिलने लोकांचे मन जिंकले आहे. पण अभिषेक शर्माला मी कधीही कमी लेखलेलं नाही. षटकार मारण्यात मी त्याच्यापेक्षा उत्कृष्ट फलंदाज अद्याप पाहिला नाही.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताच्या विजयाचं श्रेय नवजोत सिंग सिद्धूंनी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) दिलं. सिद्धू म्हणाले की, तुम्ही कधी पाहिलं आहे का की बुमराह 4 ओव्हरमध्ये 45 धावा देतो आणि त्यानंतर शिवम दुबेला खेळवायचं? याचं पूर्ण श्रेय सूर्यकुमारला दिलं जाऊ शकतं. सूर्यकुमार आणि गौतम गंभीरची जोडी अप्रतिम आहे.
Comments are closed.