ठाण्यात गोळीबार; तरुण सुदैवाने बचावला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंब्रा येथे अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच आता ठाण्यातही गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आज पहाटे नौपाड्यातील पाचपाखाडी परिसरात हा गोळीबार झाला. पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाला असून सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी हल्लेखोराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.

वागळे इस्टेटमधील हाजुरी दर्गा येथे राहणारा इंजमाम सिद्धिकी हा मध्यरात्री आपल्या मित्रांसोबत शेल पेट्रोलपंप येथे पेट्रोल भरण्यासाठी गेला होता. त्यावेळी जबिउल्ला खान हा तेथे आला आणि त्याने जुन्या भांडणावरून वाद घालण्यास सुरुवात केली. शाब्दिक बाचाबाचीमुळे वाद विकोपाला गेला आणि संतापलेल्या जबिउल्लाने पिस्तूल काढून इंजमामच्या दिशेने दोन राऊंड फायर केले. सुदैवाने या हल्ल्यात इंजमाम आणि त्याचे मित्र बचावले. या हल्ल्यानंतर जबिउल्ला फरार झाला असन पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने त्याचा शोध घेत आहेत.

Comments are closed.