2 Terrorist Arrested जम्मू काश्मिरच्या शोपियांमध्ये 2 क्रूर दहशतवादी ताब्यात, सैन्याने पाठविली ‘व्हिक्टर फोर्स’
► वृत्तसंस्था शोपियान
जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना पकडण्यासाठी राबविण्यात येणारे शोध अभियान मंगळवारी चौथ्या दिवशीही सुरू राहिले. सोमवारी रात्री अभियान काही वेळ थांबविल्यावर सुरक्षा दलांनी मंगळवारी पहाटे परिसरात पुन्हा सखोल शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
या दोन्ही दहशतवाद्यांना सर्वप्रथम 3 जुलै रोजी मीमंदर भागात टेहळण्णी कॅमेऱ्यांच्या मदतीने पाहिले गेले होते. हा पूर्ण भाग 7 गावांपर्यंत फैलावलेला आहे. भारतीय सैन्य, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या अनेक तुकडयांनी मिळून या भागाला घेरले आहे. सोमवार संध्याकाळपर्यंत सुरक्षा दलांनी 7 पैकी 4 गावांना पूर्णपणे रिकामी करवित शोध पूर्ण केला होता.
सैन्यतुकडी संशयास्पद भागात पोहोचताच तेथे अडकून पडलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यानंतर सैन्याने देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. स्थिती पाहता सैन्याच्या विशेष दहशतादविरोधी शाखा ‘व्हिक्टर फोर्स’ने स्वत:च्या अतिरिक्त सैनिकांना तैनात केले आहे. दहशतवाद्यांना तेथून पळून जाता येऊ नये म्हणून सर्व संभाव्य मार्ग सील करण्यात आले आहेत. तसेच रात्रीच्यावेळी देखरेखीसाठी पूर्ण भागात पुरेशा प्रकाशाची व्यवस्था करण्यात आली आहे.
हवामानाचे आव्हान
सुरक्षा दलांसमोर सर्वात मोठे आव्हान हवामान आणि भौगोलिक स्थितीचे आहे. तेथील बागांमध्ये असलेले वृक्ष दहशतवाद्यांना नैसर्गिक सुरक्षा कवच प्रदान करतात. यामुळे कॅमेरे आणि ड्रोनद्वारे देखरेख ठेवणे अवघड ठरते आणि दहशतवादी अनेकदा या ‘ब्लाइंड स्पॉट्स’चा लाभ घेत घेराव मोडण्याचा प्रयत्न करतात.
घेरावातील दहतशवादी
सुरक्षा नोंदीनुसार घेराव घालण्यात आलेले दोन्ही दहशतवादी दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्याचे रहिवासी आहेत.
जाकिर हा कथित स्वरुपात 2024 पासून लष्कर-ए-तोयबाशी निगडित आहे. तर लतीफ हा मागील वर्षीच लष्कर-ए-तोयबा दहशतवादी संघटनेत सामील झाला होता.
शोपियानचे सामरिक महत्त्व
शोपियां ऐतिहासिक रुपात दक्षिण काश्मीरला मध्य काश्मीर आणि पीर पंजाल पर्वतरांगेशी जोडणारा एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे. अलिकडच्या दिवसांमध्ये हल्ल्यांसाठी विदेशी दहशतवाद्यांचा पाकिस्तानकडून वापर वाढला आहे, तरीही लतीफ आणि जाकिर सारख्या ‘स्थानिक दहशतवाद्यांना’ रोखणे अत्यंत आवश्यक आहे.
यामुळै दहशतवाद्यांचे लॉजिस्टिक नेटवर्क म्हणजेच रसद अन् इतर आवश्यक सामग्री पोहोचविण्याची साखळी नष्ट करणे आणि स्थानिक युवांच्या भरतीचे चक्र मोडण्यास मोठी मदत होणार आहे. सध्या भागात अतिरिक्त सतर्कता बाळगली जात असून सुरक्षा दलांचे अभियान अंतिम टप्प्यात पोहोचत आहे.
Comments are closed.