थोडक्यात बातम्या: गाझातील 2000 आजारी मुलांना जॉर्डनमध्ये आसरा
![King Abdullah II](https://marathi.tezzbuzz.com/wp-content/uploads/2025/02/King-Abdullah-II--696x447.jpg)
अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले जॉर्डनचे राजे अब्दुल्ला यांनी गाझातील 2 हजार आजारी मुलांना आपल्या देशात आसरा देणार असल्याचे म्हटले आहे. व्हाईट हाऊसच्या ओव्हल कार्यालयात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी याबाबत सांगितले. अनेक मुले कर्करोगाने ग्रस्त असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर जॉर्डनला हलवण्यात येईल असे ते म्हणाले.
सीमेवर पाकचा गोळीबार
जम्मूतील अखनूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी पेरून ठेवलेल्या आयईडीचा भयंकर स्पह्ट झाला. त्यात कॅप्टनसह एक जवान शहीद झाला. या घटनेच्या दुस्रया दिवशी आज पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सीमेवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. त्याला हिंदुस्थानने चोख प्रत्युत्तर दिले.
Comments are closed.