लक्षवेधक – ट्रम्प मिम कॉईनने गुंतवणूकदार बुडाले
ट्रम्पच्या मिम कॉईनने गुंतवणूकदारांचे खूप नुकसान झाले. ट्रम्प मिम कॉईनची किंमत अवघ्या काही दिवसांत ऑल टाईम हाय 75 टक्के घसरून 18.92 डॉलर एवढी झाली. 17 जानेवारी 2025 रोजी ट्रम्प मिम कॉईन लाँच झाल्यानंतर क्रिप्टो बाजारात खळबळ उडाली. कॉईनची लाँचिग मूल्य 7 डॉलर होती. अल्पावधीतच ते 8 हजार टक्क्यांनी वाढून सर्वाधिक 74.85 डॉलरपर्यंत पोचले. 24 तासांत 24 टक्के घसरण झाली आहे.
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा एकदा कर्मचारी कपात
घ्या कंपनी मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा एकदा कर्मचारी कपात केली जाणार आहे. मायक्रोसॉफ्टमधील कर्मचाऱ्यांचा परफॉर्मन्स पाहून ही कर्मचारी कपात केली जाणार आहे. कर्मचाऱ्यांना टर्मिनस लेटर मिळताच कंपनीचे ऑफिस आणि सिस्टमचे ऍक्सेस हटवले जाईल. ज्या कर्मचाऱ्यांना कामांवरून काढले जाणार आहे त्यांना कंपनीकडून कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई देणार नाही, असेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
आजीबाईचे तिरुपती मंदिराला 50 लाखांचे देणगी
एका 70 वर्षांच्या आजीबाईने आपली 35 वर्षांमध्ये केलेली बचत तिरुमला तिरुपती देवस्थानच्या श्री व्यंकटेश्वरम सर्व श्रेयस ट्रस्टला दान केली. ही रक्कम 50 लाख रुपये इतकी आहे. सी. मोहना असे या महिलेचे नाव असून ती रेनिगुंटा येथील रहिवासी आहे. ही महिला संयुक्त राष्ट्रासह कोसोवो, अल्बानिया, येमेन, सौदी अरब आणि देशातील आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात काम करत होती. यावेळी मिळालेल्या पैशांतून बचत केलेली रक्कम देवाच्या चरणी टाकली आहे.
मिस्टर सॅनवालिया सेठ मंदिराला 23 कोटी
राजस्थानमधील चित्तोडगडच्या मेवाड येथील प्रसिद्ध कृष्ण धाम श्री सांवलिया सेठ मंदिराची मासिक दानपेटी उघडण्यात आली आहे. भेटवस्तू, रोख रक्कम आणि ऑनलाइन देणगीतून जवळपास 22 कोटी 92 लाख 13 हजार 317 रुपयांची देणगी मिळाली आहे. तसेच 665 ग्रॅम सोने, 133 किलो 654 ग्रॅम चांदी मंदिराला प्राप्त झाली आहे. मासिक दानपेटी मंदिर प्रशासकीय अधिकारी, मंडळ अध्यक्ष आणि सदस्य यांच्या उपस्थितीत उघडण्यात आली आहे.
टॅक्स नाही भरल्याने 30 लक्झरी कार जप्त
बंगळुरूमध्ये महागडया गाड्यांसाठी टॅक्स न भरल्याने परिवहन विभागाने शहरातील तब्बल 30 लग्झरी कार जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या या कारमध्ये महागडी फेरारी, पोर्शे, बीएमडब्ल्यू, ऑडी, एस्टन मार्टिन आणि रेंज रोव्हर या कारचा समावेश आहे. लक्झरी कार मालकांनी कारवरील टॅक्स भरावा, यासाठी ही धडक मोहीम राबवण्यात आली आहे.
इंदूरमधील दोन शाळांना बॉम्बची धोका
इंदूरमधील दोन शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. खंडवा रोडवरील एनडीपीएस आणि राऊ येथील आयपीएस स्कूल या दोन शाळांना ही धमकी मिळाली आहे. बॉम्बच्या या धमकीनंतर खबरदारीचा उपाय म्हणून शाळा प्रशासनाने मुलांना सुट्टी दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून शोध घेतला. परंतु तिथे चौकशी करताना काहीही आढळले नाही.
समुद्र धार शार्क माशाच्या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू
ऑस्ट्रेलियातील ब्रिबी द्वीपच्या वूरिम समुद्र किनाऱ्यावर एका शार्क माशाने हल्ला केल्याने यात तरुणाची मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही तरुणी समुद्र किनारी पोहत होती. त्याचवेळी शार्क माशाने तरुणीवर हल्ला केला. यात ती गंभीर जखमी झाली. यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर अलर्ट जारी केला आहे.
दिल्ली रेल्वे स्थानकाचा 25 वर्षांपासून जग रेकॉर्ड देखभाल
नवी दिल्ली रेल्वे स्टेशन या तंत्रज्ञानात सगळय़ा देशात आघाडीवर आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकाने जगातले सर्वात मोठे रुट रिले इंटरलॉकिंग सिस्टीम बनले आहे. हा रेकॉर्ड 1999 पासून आजतागायत कायम आहे. दररोज पाच लाखांहून अधिक लोक प्रवास करतात. सणासुदीला तर सहा लाखांच्या वर संख्या जाते, तर दिवसाला 250 हून अधिक ट्रेनची ये-जा होते.
आर्यन खानच्या बर्ड्स बंद बॉलिवूड सीरीजची चर्चा
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा अभिनयऐवजी दिग्दर्शक म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. आर्यनच्या दिग्दर्शनाखाली बॅड्स ऑफ बॉलिवूड ही सीरीज ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. शाहरूखला लेकाकडून खूप अपेक्षा आहेत. मला प्रेक्षकांचे जेवढे प्रेम मिळाले. त्याच्या अर्धे जरी आर्यन खानला मिळाले तरी पुष्कळ आहे, असे शाहरुख म्हणाला.
अंतराळातून 'बुर्ज खलिफा'चे दिसले भव्य देखावा
जगातील सर्वात उंच इमारत ‘बुर्ज खलिफा’ अंतराळातून एखाद्या रत्नासारखी चमकून दिसत आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनच्या एका मोहिमेवर गेलेल्या डॉन पेटिटने दुबईतील बुर्ज खलिफाचा फोटो शेअर केला. डॉन पेटिटने शेअर केलेला हा काही पहिला फोटो नाही. याआधीही त्यांनी पृथ्वीचे अनेक सुंदर फोटो अंतराळातून टिपले आहेत.
Comments are closed.