महत्त्वाचे – मालवण पुतळा दुर्घटना; आपटेला जामीन मंजूर

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने आज मंजूर केला या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्याने आरोपीला कैदेत ठेवण्याची गरज नाही तसेच या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही, त्यामुळे हत्येचा प्रयत्न केल्याचे कलम लागू होत नाही असे निरीक्षण न्यायमूर्ती नितीन बोरकर यांनी नोंदवले. राजकोट किल्ला परिसरात उभारलेला शिवरायांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळला. या घटनेने पुतळा उभारणीचे निकृष्ट काम उघड झाल्यानंतर शिल्पकार आपटेला कल्याण येथून अटक केली होती.

अग्निशमन दलात 68 मीटर उंच शिडी

मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या ताफ्यात आता 68 मीटर उंचीची टर्नटेबल लॅडर (वाहनासह शिडी) दाखल होणार असल्यामुळे 24 व्या मजल्यापर्यंत पोहोचून जीव वाचवता येणार आहेत. ही शिडी एकाच वेळी चार जणांना वाचवू शकणार आहे. या शिडय़ांच्या पुरवठ्यासाठी पालिकेने निविदा मागवल्या आहेत. सध्या अग्निशमन दलात 30 मीटर, 37 मीटर, 40 मीटर, 55 मीटर आणि 64 मीटर टर्न टेबल आहे. त्यामध्ये 68 मीटर उंचीच्या चार टर्न टेबलची भर पडणार आहे. 64 मीटर म्हणजे 21 व्या मजल्यापर्यंत या वाहनावरून लिफ्टच्या सहाय्याने पोहोचणे शक्य आहे, तर 68 मीटर उंची म्हणजे 22 ते 24 मजल्यापर्यंत ही शिडी जाईल.

Comments are closed.