पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी खेळावे का? काय म्हणाले गौतम गंभीर

एबीपी कार्यक्रमात भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांना विचारण्यात आले की, भारताला पाकिस्तानशी कोणत्याही ठिकाणावर क्रिकेट खेळले पाहिजे का? या प्रश्नावर गौतम गंभीर यांनी त्यांचे मत व्यक्त केले. गंभीर यांनी म्हटले की, भारताला कोणत्याच ठिकाणावर पाकिस्तानशी क्रिकेट सामने खेळले नाही पाहिजे.

भारत- पाकिस्तान सामना प्रश्नाविषयी गौतम गंभीरने म्हटले, माझे स्वतःचे असे म्हणणे नाही. पण सरकार ठरवेल की पाकिस्तानशी खेळायचे का नाही. पण कोणताही क्रिकेट सामना किंवा कोणताही चित्रपट आपल्या माणसांपेक्षा मोठा नाही. तसेच आपल्या भारताच्या जवानांपेक्षा सुद्धा मोठा नाही.

त्या कार्यक्रमात नंतर विचारण्यात आले की, तुम्ही रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना इंग्लंड दौऱ्यावर घेऊन जाणार आहात का? यावर प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाले, की रोहित शर्मा किंवा विराट कोहलीला संघात स्थान देणे माझ्या हातात नाही. संघ निवडण्याचे काम निवड सिलेक्शन कमिटी करते.

याच इंटरव्ह्यूमध्ये गंभीर यांना प्रश्न विचारण्यात आला की, काही अफवा पसरवल्या जात आहेत की, रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये काही तणाव आला आहे. याचं उत्तर देताना गंभीर म्हणाले, “मी सर्वात आधी विचारतो की, असे प्रश्न विचारणारे कोण आहेत? ह्या सर्व गोष्टी फक्त सोशल मीडिया आणि यूट्यूब चॅनेल चालवणाऱ्या लोकांनी त्यांची टीआरपी वाढवण्यासाठी केले आहे.

गंभीर म्हणाले, दोन महिन्यांपूर्वी टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. ते म्हणाले, जर आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलो नसतो तर माहीत नाही, मीडियाने मला कसे -कसे प्रश्न विचारले असते.

Comments are closed.