अजूनही अंतर्गत रक्तस्त्राव…श्रेयस अय्यर आयसीयूमध्ये दाखल; महत्वाची माहिती आली समोर


श्रेयस अय्यर दुखापती अपडेट: सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 9 विकेट्सनी (Ind vs Aus) दणदणीत विजय मिळवला. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 168 धावांची भागीदारी करत टीम इंडियाला (Team India) क्लीन स्वीपपासून वाचवले. मात्र, या सामन्यात फिल्डिंगदरम्यान संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दुखापतग्रस्त झाला होता. यानंतर श्रेयस अय्यर पुन्हा मैदानात आलाच नाही. त्याला रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले होते. यादरम्यान आता श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत (Shreyas Iyer Injury Update) महत्वाची माहिती समोर आली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यरला बरगडीला दुखापत (Shreyas Iyer Injury) झाली होती. सध्या श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) सिडनीच्या रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. बरगडीच्या दुखापतीमुळे अजूनही अंतर्गत रक्तस्त्राव होत असल्याची माहिती समोर आली आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी श्रेयस अय्यरला भारतीय एकदिवसीय संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यरने अर्धशतक झळकावत चांगली कामगिरी केली. तथापि, श्रेयस अय्यरची सध्याची प्रकृती पाहता पुन्हा क्रिकेटच्या मैदानात परतण्यासाठी बराच वेळ लागण्याची शक्यता आहे.

भारत अन् दक्षिण अफ्रिकेत रंगणार मालिका- (Ind vs SA)

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका 30 नोव्हेंबरपासून सुरू होईल. पहिला एकदिवसीय सामना 30 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल, त्यानंतर दुसरा 3 डिसेंबर रोजी आणि तिसरा 6 डिसेंबर रोजी होईल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी अद्याप टीम इंडियाची घोषणा झालेली नाही. तथापि, भारताची घरच्या मैदानावर ही मालिका असल्याने रोहित शर्मा आणि विराट कोहली या मालिकेत खेळण्याची अपेक्षा आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

संबंधित बातमी:

Ind vs Aus World Cup Semi Final : ठरलं तर मग! कशीबशी सेमीफायनलमध्ये पोचलेली टीम इंडिया दिग्गज ऑस्ट्रेलियाशी भिडणार, जाणून घ्या शेड्युल अन् A टू Z

आणखी वाचा

Comments are closed.