श्रेयस अय्यर कर्णधार, तर तिलक वर्मा उपकर्णधार; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारत अ संघाची


बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक दिवसीय मालिकेसाठी भारताला पथकाची घोषणा केली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळने (BCCI) ऑस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताच्या ‘अ’ संघाची घोषणा केली आहे. धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यर याला संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यापासून तिलक वर्मा भारतीय संघाचा उपकर्णधार असेल. सध्या इंडिया ‘अ’ संघ लखनऊ येथे ऑस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्ध दोन अनधिकृत कसोटी सामने खेळत आहे. वनडे मालिकेला 30 सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर सुरुवात होईल, तर 3 आणि 5 ऑक्टोबर रोजी दुसरा व तिसरा सामना याच मैदानावर रंगणार आहे.

श्रेयस अय्यर अनधिकृत कसोटी मालिकेतही कर्णधार होता, मात्र त्याने लाल चेंडूपासून (Red-Ball Cricket) थोडा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील सहा महिने तो केवळ मर्यादित षटकांच्या (लिमिटेड ओव्हर्स) क्रिकेटमध्ये दिसणार आहे, अशी पुष्टी बीसीसीआयने केली आहे.

श्रेयस अय्यरने रेड-बॉल क्रिकेटपासून ब्रेक का घेतला?

भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरने बीसीसीआयला कळवले आहे की, तो पुढील सहा महिने कसोटी क्रिकेटपासून दूर राहणार आहे. इंग्लंडमध्ये त्याच्यावर पाठीची शस्त्रक्रिया झाली होती आणि तो सावरला देखील होता, पण दीर्घ फॉर्मेट खेळताना त्याला पुन्हा एकदा स्नायूंचा त्रास जाणवला. म्हणूनच तो हा काळ स्वतःची फिटनेस, सहनशक्ती आणि शारीरिक ताकद सुधारण्यासाठी वापरणार आहे. याच कारणामुळे त्याचा इराणी कपसाठी विचार करण्यात आला नाही.

श्रेयस अय्यर कर्णधार, तिलक वर्मा उपकर्णधार

अय्यरच्या नेतृत्वाखालील इंडिया ‘अ’ संघात पहिल्या सामन्यासाठी रियान पराग, आयुष बडोनी, रवि बिश्नोई आणि प्रियांश आर्या यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यापासून तिलक वर्मा व अभिषेक शर्मा संघात परतणार आहेत, तर वेगवान गोलंदाज हर्षित राणा देखील जोडला जाणार आहे. तिलक वर्मा अंतिम दोन सामन्यांत उपकर्णधाराची जबाबदारी सांभाळेल.

ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी भारत अ संघ – श्रेयस अय्यर (कर्नाधर), प्रभासिमरन सिंग (यशर रक्ष), रायन परग, आयुष बडोनी, सूर्यश शेज, विप्राज निगम, निशांत सिंधू, गुरजपनीत सिंग, युधवीर सिंग, रवी बिशन सिमरजित गाणे.

ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेसाठी भारत अ संघ – श्रेयस अय्यर (कर्नाधर), टिळ वर्मा (उपमत), अभिषेक शर्मा, प्रभासिमरन सिंग (यशर रक्ष), रायन परग, आयुश बडोनी, सूर्यश शेज, विप्रज निगुश, गर्जेफे (यशरक्षक), हर्षित राणा.

हे ही वाचा –

Ind vs Pak Asia Cup 2025 : हारिस अन् साहिबजादावर बीसीसीआयने अ‍ॅक्शन घेताच पाकिस्तान चवताळला; म्हणाला, तो सूर्यकुमार यादव…

आणखी वाचा

Comments are closed.