श्रेयस अय्यरला मिळणार टीम इंडियाची कमान? रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
श्रेयस अय्यर: यंदाचा आयपीएल हंगाम श्रेयस अय्यरसाठी खूप संस्मरणीय ठरला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्जला पहिल्यांदाच ट्रॉफी मिळवता आली नसली तरी संघ 11 वर्षांनी जेतेपदाच्या सामन्यात उतरला होता. अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाबने विरोधी संघांविरुद्ध आक्रमक खेळ केला. कर्णधारपदासोबतच अय्यरने फलंदाजीनेही खूप धुमाकूळ घातला. अय्यरने पंजाबसाठी फलंदाजीतून सर्वाधिक धावा केल्या. श्रेयसने 17 सामन्यांमध्ये 604 धावा केल्या. अय्यरला लवकरच त्याच्या अद्भुत कामगिरीचे बक्षीस मिळू शकतो. एका रिपोर्टमध्ये अय्यरबद्दल मोठा खुलासा करण्यात आला आहे. आयपीएलमध्ये सलग 2 हंगाम चांगले कर्णधारपद भूषवून अय्यरने भारतीय संघाचा पुढचा कर्णधार बनण्याच्या शर्यतीत स्वतःला उतरवले आहे असे मानले जाते.
आयपीएल आणि वनडे क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरसाठी चांगले दिवस येत आहेत. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, अय्यरने कर्णधार म्हणून सर्वांना खूप प्रभावित केले आहे. तो भारतीय संघाचा पुढचा व्हाईट बॉल कर्णधार बनण्याच्या शर्यतीत सामील झाला आहे. एका अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, “सध्या श्रेयस अय्यर फक्त वनडे सामने खेळतो, पण आयपीएलनंतर आम्ही त्याला टी20 आंतरराष्ट्रीय आणि अगदी कसोटी संघापासूनही दूर ठेवू शकणार नाही. यासोबतच, अय्यर देखील व्हाईट बॉल कर्णधारपदाच्या शर्यतीत सामील झाला आहे.”
सूर्यकुमार यादव सध्या भारतीय संघाच्या टी-20 आंतरराष्ट्रीय संघाचे नेतृत्व करतो. (Suryakumar Yadav Team India T20I Captain) त्याच वेळी, वनडे संघाचे नेतृत्व रोहित शर्माच्या हाती आहे. (Rohit Sharma Taam India ODI Captain)
गेल्या 2 आयपीएल हंगामात श्रेयस अय्यरने आयपीएलमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. 2024 मध्ये, अय्यरने त्याच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन बनवले. त्यानंतर, या हंगामात अय्यरला पंजाब किंग्जने 26.75 कोटींना विकत घेतले आणि त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली. अय्यर संघ व्यवस्थापनाच्या अपेक्षा पूर्ण करत होता आणि त्याने 11 वर्षांनंतर पंजाबला फायनलमध्ये पोहोचवले.
Comments are closed.