मराठमोळ्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय टीम इंडियाचा स्टार श्रेयस अय्यर; ओळखलं का कोण?
श्रेयस अय्यर मराठी अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या डेटिंग अफवा: काही दिवसांपूर्वी मैदानात गंभीर जखमी झालेला टीम इंडियाचा (Team India) स्टार क्रिकेटपटू श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या रिकव्हरी स्टेजला आहे. पण, सध्या दुखापतीतून सावरत असलेला श्रेयस अय्यर चर्चेत आला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान खेळल्या गेलेल्या वनडे सीरिजमध्ये श्रेयस नुकताच भारताचा उपकर्णधार म्हणून दिसला होता. त्याच सीरिजमध्ये श्रेयसला गंभीर दुखापत झालेली. आता उपचार घेत असलेल्या श्रेयसच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. पण, तुम्हाला माहितीय का? सध्या श्रेयस अय्यरच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या आहेत. तेसुद्धा मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत.
मीडिया रिपोर्टनुसार, टीम इंडियाचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यरचं सूत जुळलं आहे. तो एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या प्रेमात अडकला आहे. एका रेडिट युजरनं श्रेयस अय्यरच्या डेटिंगबद्दल मोठा दावा केला आहे. युजरनं म्हटलंय की, श्रेयस अय्यर गपचूक आपलं प्रकरण पुढे नेतोय.
लो बजेट मूव्हीसुद्धा हिट करणारी मराठमोळी अभिनेत्री (Shreyas Iyer Dating Rumors With मराठी अभिनेत्री)
श्रेयस अय्यरचं ज्या मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत सूत जुळलंय ती अभिनेत्री म्हणजे, अभिनेत्री मृणाल ठाकूर. आधी साऊथ फिल्म इंडस्ट्री आणि त्यापाठोपाठ बॉलिवूडमध्ये झळकलेल्या मृणाल ठाकरूनं अनेक लो बजेट मूव्हीसुद्धा हिट केलेत. तिच्या आजवरच्या बऱ्याच सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. अशातच बॉलिवूडच्या हिट अभिनेत्रीचं नाव श्रेयस अय्यरशी जोडलं जात आहे.
रेडिटवर शेअर करण्यात आलेल्या एका पोस्टनुसार, मृणाल आणि श्रेयस गेल्या काही महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. या पोस्टमध्ये असंही म्हटलंय की, या दोघांचं नातं प्रायमरी स्टेजला आहे आणि त्यांना ही बाब सध्या खासगीतच ठेवायचीय. श्रेयस आणि मृणालच्या अफेअरच्या चर्चा समोर येताच, नेटकऱ्यांनी श्रेयस आणि मृणाल यांच्या जोडीला लगेचच स्विकारलंय… एवढंच काय तर, चाहत्यांनी दोघांचं नाव जोडून एक हॅशटॅग तयार केलाय. युजर्सनी #Shreyal असा खास कपल हॅशटॅग तयार केलाय. हा हॅशटॅग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यापूर्वी धनुषसोबत जोडलं गेलेलं मृणाल ठाकूरचं नाव
साऊथच्या सुपरस्टार्सच्या यादीत आपलं स्थान निर्माण केलेला अभिनेका धनुष, नेहमीच आपल्या वेगळ्या धाटणीच्या सिनेमांमुळे चर्चेत असतो. धनुषनं थलायवा सुपरस्टार रजनीकांत यांच्या मुलीशी लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर ऐश्वर्या आणि धनुषनं आपल्या सुखी संसारातून काडीमोड घेत वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पण, त्यानंतर त्याचं नाव मृणाल ठाकूरशी जोडलं गेलं होतं. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले असून डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
आणखी वाचा
Comments are closed.