श्रेयस अय्यरची दुखापत गंभीर; अतिदक्षता विभागामध्ये केलं दाखल, ऑस्ट्रेलियाविरुद्ध झेल घेताना झालेला जायबंदी

ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या वनडे लढतीत हिंदुस्थानचा स्टार खेळाडू आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर जायबंदी झाला होता. त्यामुळे त्याला सामना अर्धवट सोडून मैदानाबाहेर जावे लागले होते. आता त्याच्या तब्येतीबाबत नवीन माहिती समोर आली आहे.

श्रेयस अय्यरची दुखापत गंभीर असून त्याच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत. झेल घेताना श्रेयस अय्यर पोटावर आदळला होता आणि यामुळे अंतर्गत रक्तस्राव झाला. त्यामुळे त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते. फिट होऊन मायदेशी परतण्यासाठी त्याला एक आठवडा रुग्णालयात काढावा लागणार आहे.

Comments are closed.