‘याला काहीच अर्थ नाही' आशिया कपसाठी श्रेयस अय्यरची निवड न झाल्याने संजय मांजरेकरांचा संताप

श्रेयस अय्यरला (Shreyas iyer) आशिया कप 2025 (Asia Cup 2025) मध्ये संधी मिळालेली नाही. मात्र तो मेगा इव्हेंटसाठी भारतीय संघात डिझर्व्ह करत होता. या खेळाडूने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 नंतर आयपीएल 2025 मध्येही दमदार खेळ दाखवला होता. आयपीएलमध्ये त्याने जवळपास 50 च्या सरासरीने धावा केल्या होत्या. अय्यरऐवजी शुबमन गिलला (Shubman gill) संधी मिळाल्याने संजय मांजरेकरांनी (Sanjay Manjrekar) आपली भडास काढली आहे. त्यांनी निवडकर्त्यांवर चांगलीच टीका केली आहे.

श्रेयस अय्यरला आशिया कप 2025 मध्ये न निवडल्याने संजय मांजरेकरांनी संताप व्यक्त केला आहे. आपल्या इन्स्टाग्रामवर त्यांनी लिहिलं की, हे काही मी अलीकडेच पाहिलेलं नाही, तर गेल्या काही वर्षांपासून पाहतो आहे की निवडकर्त्यांची ही सवय झाली आहे, एखाद्या खेळाडूला ज्या फॉरमॅटमध्ये तो चांगला खेळतो त्यावरून निवडून घेणं आणि मग त्याला दुसऱ्या फॉरमॅटसाठीही निवडून टाकणं. जेव्हा मी एखाद्या खेळाडूला टेस्टमधल्या कामगिरीवरून टी-20 संघात संधी मिळताना पाहतो, तेव्हा मला ते क्रिकेटच्या तर्काशी विसंगत वाटतं. याचा काहीही अर्थ लागत नाही. श्रेयस अय्यरचा आशिया कपसाठी भारताच्या या टी-20 संघात समावेश न होणं अत्यंत धक्कादायक आहे, असंही ते म्हणाले.

आशिया कपसाठी भारताचा संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हर्षित राणा, रिंकू सिंह.

स्टँडबाय खेळाडू : यशस्वी जयस्वाल, प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, रियान पराग आणि ध्रुव जुरेल

Comments are closed.