श्रेयस अय्यरने BCCI ला पाठविले पत्र, रेड-बॉल क्रिकेटपासून घेणार ब्रेक?
भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरने भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाला (BCCI) पत्र लिहिले आहे की, त्याला पाठीत जडपणा आणि थकवा यासंदर्भातील समस्या असल्यामुळे तो काही काळ ‘रेड बॉल क्रिकेट’पासून विश्रांती घेणार आहे.
अय्यरला सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध चालू असलेल्या मालिकेसाठी इंडिया ए टीमचा कर्णधार म्हणून निवडले होते , त्याने मंगळवारी लखनऊमध्ये सुरू झालेल्या दुसऱ्या अनधिकृत कसोटीतून आपला सहभाग मागे घेतला. निवड समितीचे अध्यक्ष अजित अगरकर आणि निवडकांशी चर्चा केल्यानंतर, अय्यर यांनी आपली विनंती औपचारिक स्वरूपात मेलद्वारे सादर करण्याचा निर्णय घेतला.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, अय्यरने निवडकांना सांगितले की त्याला पाठीत जडपणा जाणवत आहे आणि त्याचे शरीर आता रेड बॉल क्रिकेटच्या ताणाला सहन करू शकत नाही. अय्यर मैदानावर चार दिवसांपेक्षा जास्त राहू शकत नाही आणि म्हणूनच तो आपल्या शरीराला लांब फॉरमॅट खेळण्यासाठी तयारी होईपर्यंत ब्रेक घेण्याचा विचार करत आहे. अय्यरने मंडळाला सांगितले की, मागील वर्षी त्यांनी रणजी ट्रॉफीच्या सामन्यात खेळले होते, जिथे तो ओव्हर्सच्या दरम्यान विश्रांती घेऊ शकला, परंतु इंडिया ए किंवा टेस्ट क्रिकेट खेळताना ते तेच करू शकत नाही.
“अय्यर ने आम्हाला सांगितले आहे की तो रेड बॉल क्रिकेटपासून ब्रेक घेणार आहे आणि हे स्पष्ट केलेले चांगले आहे कारण निवडकांसाठी आता त्याच्या भविष्याबाबत स्पष्टता आली आहे. येत्या काही महिन्यांमध्ये तो रेड बॉल क्रिकेट खेळणार नाही आणि त्याने मंडळाला सांगितले आहे की भविष्यात तो फिजिओ आणि प्रशिक्षकांच्या सल्ल्याने आपले शरीर तपासेल आणि त्यानुसार निर्णय घेईल,” एका सूत्राने सांगितले.
Comments are closed.