Asia Cup: आशिया कप 2025 साठी श्रेयस अय्यरला टीममध्ये संधी का नाही मिळाली? खरं कारण समोर

भारतीय संघातील स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas iyer) एकेकाळी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळताना दिसत होता. त्यामुळेच त्याला “भविष्यातला स्टार” म्हटलं जात होतं. मात्र सध्या अय्यर फक्त वनडे संघाचाच भाग आहे. चांगली कामगिरी करूनही श्रेयसला कसोटी आणि टी20 संघात संधी मिळत नाही. आशिया कप 2025 (Asia Cup 2025) चा संघ जाहीर झाल्यानंतर हा प्रश्न आणखी मोठा झाला, श्रेयस टी20 संघात कमबॅक का करू शकला नाही?

टीम इंडियातून बाहेर पडल्यानंतर श्रेयस अय्यरने रणजी ट्रॉफीत भरपूर धावा केल्या. याशिवाय विजय हजारे ट्रॉफी आणि सैयद मुश्ताक अली ट्रॉफीतही त्याने धावांचा पाऊस पाडला. भारतीय संघासाठी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्येही त्याने अप्रतिम फलंदाजी केली. त्यानंतर IPL मध्येही धावांचा डोंगर उभा केला. तरीसुद्धा त्याला संघात जागा मिळालेली नाही. न्यूज 24 च्या रिपोर्ट्सनुसार गौतम गंभीर आणि श्रेयस अय्यर यांच्यात सगळं काही ठीक नाही.

श्रेयसचा कमबॅक न झाल्यामुळे चाहते नाराज आहेत. सोशल मीडियावर अनेकांनी विचारले आहे की, अशा कामगिरीनंतरही त्याला टी20 संघात संधी का मिळत नाही. काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, टीम व्यवस्थापन आपली स्ट्रॅटेजी आणि संघ संतुलन लक्षात घेऊन निर्णय घेत आहे, पण चाहते अजूनही श्रेयसला पाहण्याची अपेक्षा करत आहेत.

Comments are closed.