ब्रॉडचा धक्कादायक निर्णय, भारत अन् इंग्लंडच्या संयुक्त संघातून शुभमन गिल, रवींद्र जडेजा बाहेर
नवी दिल्ली: शुभमन गिलच्या नेतृत्त्वात भारतानं इंग्लंड विरुद्धची 5 कसोटी सामन्यांची मालिका 2-2 अशा बरोबरीत सोडवली. शुभमन गिलनं 5 कसोटी सामन्याच्या 10 डावांमध्ये 754 धावा केल्या होत्या. एका मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत शुभमन गिल दसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. मात्र, इंग्लंडचा माजी कॅप्टन स्टुअर्ट ब्रॉडनं दोन्ही संघांची संयुक्त प्लेईंग इलेव्हन निवडली. यामध्ये शुभमन गिलला आणि रवींद्र जडेजाला स्थान देण्यात आलं नाही. स्टुअर्ट ब्रॉडनं असं करण्यामागील कारण देखील सांगितलं आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांची कसोटी मालिका 2-2 अशा बरोबरित सुटली आहे. भारतानं मँचेस्टर कसोटी अनिर्णित राखण्यात यश मिळवलं. इंग्लंडचा माजी कॅप्टन स्टुअर्ट ब्रॉडनं दोन्ही संघांतील खेळाडूंची संयुक्त प्लेईंग इलेव्हन निवडली आहे. यामध्ये भारताचे 6 आणि इंग्लंडचे 5 खेळाडू निवडले. मात्र, शुभमन गिलला आणि रवींद्र जडेजाला संघात स्थान दिलं नाही. त्यानंतर त्याला नेकांनी प्रश्न विचारले आहेत.
स्टुअर्ट ब्रॉडची संयुक्त 11 वाजत आहे
यशसवी जयस्वाल, केएल राहुल, ओली पोप, जो रूट, होरी ब्रूक, बेन स्टोक्स (कॅप्टन), ish षभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
गिल,जडेजाला स्थान का नाही
स्टुअर्ट ब्रॉड ने सोशल मिडिया वर एका पोस्टला उत्तर दिलं आहे. त्यामध्ये ब्रॉड म्हणाला की तुम्ही आवश्यक असलेला मुद्दा विसरत आहात. शुभमन गिलला चौथ्या स्थानावर असायला हवं होत पण जो रुट चौथ्या स्थानावर चांगली कामगिरी करत आहे. बेन स्टोक्स रवींद्र जडेजापेक्षा चांगली कामगिरी करतोय, प्रामुख्यानं गोलंदाजीमध्ये असं स्टुअर्ट ब्रॉड म्हणाला.
जो रुट विरुद्ध शुभमन गिल कुणी जास्त धावा केल्या?
शुभमन गिलनं या मालिकेत 10 डावात 754 धावा केल्या, यात त्यानं चार शतकं केली. गिलनं दुसऱ्या कसोटीत 269 धावा केल्या. ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात त्यानं 161 धावा केल्या होत्या. एका कसोटीत सर्वाधिक 430 धावा करणारा भारतीय खेळाडू शुभमन गिल ठरला आहे.
जो रुट ने या मालिकेत तीन शकं केली. त्याची सर्वाधिक धावसंख्या 150 धावा होत्या. रुटनं 150 धावा चौथ्या कसोटीत केल्या आहेत. रुटनं या मालिकेत रिकी पाँटिंगचा 13378 धावांचा टप्पा पार केला. रुट कसोटीत सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे.
रवींद्र जडेजाची दमदार कामगिरी
मँचेस्टर कसोटीत भारत पराभवाच्या छायेत होता. मात्र, जडेजानं वॉशिंग्टन सुंदरच्या साथीनं चौथी कोटी ड्रॉ केली. जडेजानं दुसऱ्या कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये अर्धशतक केलं होतं. जडेजाच्या जागी स्टुअर्टनं बेन स्टोक्सला प्लेईंगमध्ये स्थान देत कॅप्टन केलं आहे.
अँडरसन-टेंडुलकर ट्रॉफी 2025 मध्ये स्टुअर्ट ब्रॉड पिक्स एकत्रित भारत-इंग्लंड इलेव्हन:
– जयस्वाल, केएल राहुल, पोप, रूट, ब्रूक, स्टोक्स (सी), पंत, सुंदर, आर्चर, बुमराह, सिराज. pic.twitter.com/b5k5vslv6t
– तनुज (@आयमतानुजसिंग) 5 ऑगस्ट, 2025
आणखी वाचा
Comments are closed.