सारा तेंडुलकरबाबत शुबमन गिलचं उत्तर ऐकून चाहते उत्सुक! काय आहे नक्की सत्य?

भारतीय संघाचा शानदार फलंदाज शुबमन गिल त्याच्या चांगल्या फलंदाजीमुळे चांगला चर्चेत आहे. त्याचसोबत त्याच्या पर्सनल आयुष्याबद्दलही कायमच सोशल मीडियावर चर्चा होत असतात. काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये शुबमन गिलचं नाव सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर हिच्याशी जोडलं जात आहे. मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर गिलचा एक व्हिडिओ चांगलाच वायरल होत आहे. ज्यामध्ये त्याला सारा तेंडुलकर बद्दल विचारण्यात आलं. जाणून घ्या उत्तर देेताना काय म्हणाला शुभमन गिल ?

सोशल मीडियावर चर्चेमध्ये असलेला हा व्हिडिओ मागील काही दिवसांपासूनच चर्चेत आहे, पण आत्ता चॅम्पियन्स ट्रॉफी मधील शुबमन‌‌ गिलची तुफानी फलंदाजी पाहून तो व्हिडिओ पुन्हा चर्चेत आला आहे. या व्हिडिओ बद्दल अँकरने गिलला प्रश्न विचारला की तू आणि सारा रिलेशनशिप मध्ये आहात का? या प्रश्नाचे उत्तर देताना शुबमन म्हणाला – कदाचित.

सारा आणि शुबमन गिल यांचं नाव खूप दिवसांपासून एकमेकांसोबत जोडले जात आहे, पण या गोष्टींमध्ये किती तथ्य आहे हे अजून समोर आलेलं नाही. तसेच सारा आणि शुबमन कडून त्यांच्या नात्यावर अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.

भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये पदार्पण करत असताना त्याने बांगलादेश विरुद्ध शानदार शतकी खेळी केली. दुबईमध्ये बांगलादेश विरुद्ध सामना खेळताना त्याने नाबाद 101 धावांची तुफानी पारी खेळली. यादरम्यान त्याने 9 चौकार आणि 2 षटकार लावले. तसेच त्याने पाकिस्तान विरुद्धच्या महासामन्यात शानदार अशी पारी खेळली. त्यादरम्यान त्याने विराट कोहली सोबत 69 धावांची भागीदारी केली. तेव्हा गिल 44 धावा बनवून बाद झाला. तसेच शुबमन या स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.

हेही वाचा

आयपीएल 2025 मध्ये टीम इंडियाबाबत बीसीसीआय घेणार ‘हा’ मोठा निर्णय

आयपीएल 2025 पूर्वी मोठी घोषणा; दिल्ली कॅपिटल्समध्ये ‘या’ खेळाडूची एन्ट्री

IPL 2025: KKRच्या कर्णधारपदासाठी स्टार खेळाडू सज्ज! म्हणाला…

Comments are closed.