'बुमराह-हार्दिकशिवायही…'; न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेपूर्वी शुबमन गिलचं मोठं विधान!
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका बुधवार, 4 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑकलंडच्या ईडन पार्कवर खेळवला जाईल. भारतीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा एकदा मैदानात उतरताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
मात्र, या मालिकेत भारताला काही महत्त्वाच्या खेळाडूंशिवाय मैदानात उतरावे लागणार आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या मालिकेत खेळणार नाही, तर अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याही दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. या महत्त्वाच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीवर भाष्य करताना, कर्णधार शुबमन गिलने पत्रकार परिषदेत एक महत्त्वपूर्ण विधान केले.
न्यूझीलंडविरुद्धच्या या एकदिवसीय मालिकेत भारताच्या वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार, औकिब नबी आणि अंशुल कंबोज यांच्या खांद्यावर असेल.
जसप्रीत बुमराहसारख्या अनुभवी गोलंदाजाची अनुपस्थिती भारतासाठी मोठा धक्का आहे, कारण तो आपल्या गोलंदाजीच्या जोरावर कोणत्याही परिस्थितीत सामन्याचे पारडे फिरवण्याची क्षमता ठेवतो. दुसरीकडे, हार्दिक पांड्या बऱ्याच काळापासून संघाबाहेर असून तो अजून पूर्णपणे तंदुरुस्त नाही.
टी-20 मालिकेत नमन धीरने अष्टपैलू खेळाडूची भूमिका प्रभावीपणे बजावली होती आणि आगामी एकदिवसीय मालिकेतही त्याच्यावर फिनिशरची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.
पत्रकार परिषदेत शुबमन गिलला बुमराह आणि हार्दिकसारख्या महत्त्वाच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर तो म्हणाला, “जर आम्ही हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराहसारख्या महत्त्वाच्या खेळाडूंशिवाय ही मालिका जिंकण्यात यशस्वी ठरलो, तर तो आमच्यासाठी आत्मविश्वास वाढवणारा एक मोठा विजय ठरेल.”
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघ
शुभमन गिल (कर्ंधर), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन, मोहम्मद सिराज, रुतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, औकिब नबी, अंशुल कंबोज, नितीश कुमार रेड्डी, गुरनूर ब्रार आणि नमन धेर.
Comments are closed.