बॅट-हेल्मेट फेकत शुभमन गिल जोरजोराने ओरडला; स्टोक्सचा एक वार अन् भारतीय कर्णधार तडफडू लागला, का
इंग्लंड विरुद्ध भारत चौथी कसोटी अद्यतनः इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल याने सातत्यपूर्ण चांगली फलंदाजी केली आहे. संपूर्ण मालिकेदरम्यान क्वचितच असं काही पाहायला मिळालं जिथं इंग्लंडच्या गोलंदाजांनी गिलला फारसं अडचणीत टाकलं. मात्र मँचेस्टर कसोटीत एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. दुसऱ्या डावात गिलला एक जबरदस्त चेंडूचा सामना करावा लागला. हा चेंडू टाकणारा दुसरा कोणी नसून इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स होता. ज्यामुळे भारतीय कर्णधार शुभमन गिल बॅट-हेल्मेट फेकत जोरजोराने ओरडला.
गिलला जबरदस्त दुखापत
टीम इंडिया चौथ्या कसोटीचा पाचवा दिवस वाचवण्याच्या प्रयत्नात होता. दुसऱ्या डावात गिलने केएल राहुलसोबत डाव सावरायला सुरुवात केली होती. पण पाचव्या दिवशी राहुल लवकर बाद झाला. मात्र गिल एकटाच झुंज देत राहिला. याच काळात स्टोक्सने चेंडू हातात घेतला. तो स्वतः तिसऱ्या दिवशी फलंदाजीदरम्यान दुखापतग्रस्त झाला होता आणि चौथ्या दिवशी गोलंदाजी करू शकला नव्हता. पण पाचव्या दिवशी मैदानात उतरल्यावर त्याने गिलला त्रास देण्यास सुरुवात केली.
स्टोक्सचा एक वार अन् भारतीय कर्णधार तडफडू लागला
स्टोक्सने टाकलेला एक गुड लेंथ चेंडू अचानक जबरदस्त उसळला आणि गिल पूर्णतः चकमा खाऊन गेला. चेंडू आधी त्याच्या उजव्या हाताच्या बोटांवर आणि नंतर थेट हेल्मेटच्या साइडवर लागला. यामुळे गिल जोरात किंचाळला आणि तात्काळ बॅट जमिनीवर टाकून बाजूला झाला. त्याच्या वेदनांनी तो हेल्मेट काढून बाजूला गेला आणि हात हलवत वेदना व्यक्त करत राहिला. हे पाहून टीम इंडियाचा फिजिओ तात्काळ मैदानावर धावला आणि गिलची प्राथमिक तपासणी करून स्प्रे मारला. तरीही गिल वेदनेत दिसत होता.
हिट्स घेत आहे, परंतु अजूनही उभे आहे – मँचेस्टर मधील भारताची कहाणी#Sonsportsnetwork #ग्राउंडटुमहाराजेथमरी #ENGVIND #Nayaindia #Dhaakadindia #Teamindia #Extrainingsings pic.twitter.com/racbgv9y2p
– सोनी स्पोर्ट्स नेटवर्क (@sonsportsnetwk) 27 जुलै, 2025
दुखापतीतूनही शतकाची झुंज
यानंतरही गिलने हार मानली नाही. जबरदस्त धैर्य दाखवत त्याने मालिकेतील आपलं चौथं शतक साजरं केलं. गिलने 228 चेंडूंमध्ये आपलं नववं टेस्ट शतक पूर्ण केलं. सेशन संपण्याआधी तो 103 धावा करून बाद झाला. मात्र या खेळीनंतर त्याने मालिकेत 700 धावांचा टप्पा गाठला आणि एक ऐतिहासिक विक्रमही आपल्या नावावर केला, इंग्लंडमध्ये एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा आशियाई फलंदाज बनला, त्याने एकूण 722 धावा करत हा पराक्रम गाठला.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.