शुभमन गिलने इंग्लंडमध्ये रचला नवा इतिहास! मोडला गावसकरांचा 'हा' विक्रम
भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलने एजबॅस्टन कसोटीच्या दुसऱ्या डावात शतक झळकावले. गिलने 129 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकार मारून हे शतक पूर्ण केले. या शतकासह गिलने भारतीय दिग्गज सुनील गावस्कर यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. सुनील गावस्कर हे एकाच कसोटी सामन्यात द्विशतक आणि शतक करणारे एकमेव भारतीय खेळाडू होते, परंतु शुभमन गिलने आता हा विक्रमही आपल्या नावे केला आहे.
शुभमन गिलने आपल्या फलंदाजीने खूप उत्कृष्ट कामगिरी केली आहे.. दुसरा कसोटी सामना एजबॅस्टन येथे खेळला जात आहे. गिलने या सामन्याच्या दोन्ही डावात 350 हून अधिक धावा केल्या आहेत. गिलने या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 387 चेंडूत 269 धावा केल्या, ज्यामध्ये 30 चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. त्याच वेळी, दुसऱ्या डावातही गिल ताकदीने उभा असल्याचे दिसून येते. एजबॅस्टनची खेळपट्टी गिलला आवडते. कर्णधार दुसऱ्या डावात 130 चेंडूत 100 धावा काढत आहे.
लइंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शुभमन गिलनेही शानदार फलंदाजी केली. लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय कर्णधाराने 227 चेंडूत 147 धावा केल्या, ज्यामध्ये 19 चौकार आणि एक षटकार होता. दुसऱ्या डावात गिल 16 चेंडूत फक्त 8 धावा करू शकला. भारताने पहिली कसोटी गमावली, परंतु भारतीय फलंदाजांनी इंग्लंडमध्ये दमदार कामगिरी केली.
शुभमन गिल या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. गिलला या मालिकेत अजून तीन सामने खेळायचे आहेत. गिलने आतापर्यंत दोन सामन्यांमध्ये 500 हून अधिक धावा केल्या आहेत. मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियन दिग्गज डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे. 1930 च्या अॅशेस मालिकेत डॉन ब्रॅडमनने पाच सामन्यांमध्ये 974 धावा केल्या होत्या. जर गिलने अशीच फलंदाजी सुरू ठेवली तर तो 95 वर्षांचा डॉन ब्रॅडमनचा विक्रम मोडू शकतो
Comments are closed.