हाताला सलाईन, मानेला पट्टा! शुभमन गिलला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, पण व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
शुभमन गिल डिस्चार्ज हॉस्पिटल : भारताचा कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोलकात्यात झालेल्या पहिल्या कसोटीत त्याला अचानक ‘नेक स्पॅझम’ झाल्याने तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले होते. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे, मात्र गुवाहाटी कसोटीत तो खेळतील की नाही, यावर मोठा प्रश्नचिन्ह कायम आहे.
टीम इंडिया सोमवारी कोलकात्यात सराव करणार आहे, पण गिल या सत्रात सहभागी होणार नाहीत. बुधवारी भारतीय संघ गुवाहाटीकडे रवाना होणार आहे. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, अशा प्रकारच्या मानदुखीमधून सावरत असलेल्या खेळाडूंनी कॉमर्शियल फ्लाइटने प्रवास करू नये. त्यामुळे गिलचा संघासोबत प्रवास करणेही अवघड दिसत आहे.
शुभमन गिल दुसऱ्या कसोटीत खेळणार का? गौतम गंभीर काय म्हणाला?
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने सामन्यानंतर सांगितले, “गिल अजूनही असेसमेंटमध्ये आहेत. फिजिओ आणि मेडिकल टीम त्याची प्रकृतीचे कशी आहे ते बघत आहेत.” गिलच्या अनुपस्थितीचा परिणाम कोलकाता कसोटीच्या चौथ्या डावात स्पष्टपणे दिसला आणि भारत 124 धावांच्या लहान लक्ष्याचा पाठलाग करू शकला नाही.
गौतम गंभीर म्हणाला की, “आम्हाला माहित होते की आम्ही एका फलंदाजाने कमी आहोत. शुभमन नव्हता आणि त्यात वरून लंचपूर्वी दोन विकेट पडल्या. किमान 50 धावांची भागीदारी झाली असती तर सामना आमच्या हातात आला असता.”
भारतासाठी चांगली बातमी 🚨
कॅप्टन शुभमन गिल यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. #शुबमनगिल pic.twitter.com/OhrvQVWYp2
— 𝔸ℝ𝕀𝔽 SRK (@Arif011111) 16 नोव्हेंबर 2025
गिल नसेल तर कोण?
गिलच्या जागी दोन नावे आघाडीवर आहेत, साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कल. सुदर्शनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दिल्ली टेस्टमध्ये 87 आणि 39 धावा केल्या होत्या. मात्र दक्षिण आफ्रिका अ विरुद्धच्या अलीकडील चार डावांत त्याचा सर्वोच्च स्कोर 32 आहे. पडिक्कलने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आणि इंग्लंड मालिकेत प्रत्येकी एक कसोटी खेळली आहे. दक्षिण आफ्रिका अ विरुद्ध तीन वेळा तो एकअंकी धावसंख्येत बाद झाला आणि त्यांचा सर्वोच्च स्कोर 24 होता.
या दोघांपैकी जर एकजण संघात आला, तर भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तब्बल सात डावखुरे फलंदाज असतील. कोलकात्यात भारताने पहिल्यांदा सहा डावखुरे फलंदाज खेळवले होते, आणि दक्षिण आफ्रिकेच्या ऑफस्पिनर्स हार्मर व एडन मार्कराम यांनी त्यापैकी सात फलंदाजांना माघारी धाडले.
गिलची वाढती चिंता
शुभमन गिल याआधीही याच वर्षी ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत मानदुखीमुळे एक कसोटी खेळला नव्हता. आयपीएल 2025 पासून तो सतत सर्व फॉर्मेटमध्ये खेळत आहेत. त्याच्या वर्कलोडबाबत आधीपासूनच चर्चा सुरू होतीच, आणि या नवीन दुखापतीमुळे टीम मॅनेजमेंटची चिंता आणखी वाढली आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.