शुभमन गिलचं धडाकेबाज द्विशतक, 21 चौकार, 2 षटकारांसह 311 चेंडूत 200 धावा

बर्मिंघम : भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्त्व शुभमन गिलकडे सोपवण्याचा निवड समितीचा निर्णय योग्य ठरला आहे. शुभमन गिलनं बर्मिंघम कसोटीमध्ये द्वीशतक झळकावलं आहे. सुरुवातीला यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत, रवींद्र जडेजा आणि त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर यांच्यासोबत भागीदारी करत भारतीय संघाला समाधानकारक धावसंख्येजवळ शुभमन गिलनं पोहोचवलं आहे. त्यासोबतच शुभमन गिलनं इंग्लंडमध्ये भारताचा कॅप्टन म्हणून सर्वाधिक धावा केल्या आहेत. मोहम्मद अजहरुद्दीन यानं 1990 मध्ये 179 धावांची खेळी केली होती. शुभमन गिलनं दमदार कामगिरी करत भारताला मजबूत स्थितीत पोहोचवलं आहे. शुभमन गिलनं या डावात 21 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत.

शुभमन गिलनं भारताचा डाव सावरला

भारतानं काल 211 धावांवर पाच विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर शुभमन गिल आणि रवींद्र जडेजा या दोघांनी 203 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळं भारतीय संघ मजबूत स्थितीत पोहोचला. भारतानं 470 धावांचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये यशस्वी जयस्वाल 87 आणि रवींद्र जडेजाच्या 89 धावांचा समावेश आहे. शुभमन गिलच्या द्विशतकी खेळीमुंळं इंग्लंडचा संघ बॅकफूटवर गेला आहे.

भारतानं एजबेस्टनमध्ये यापूर्वी सर्वाधिक 416 धावा केल्या होत्या. तो विक्रम देखील शुभमन गिलच्या द्विशतकामुळं मोडला गेला आहे. शुभमन गिलनं अशीच फलंदाजी सुरु ठेवली तर राहुल द्रविड आणि सुनील गावसकर यांचा विक्रम देखील तो मोडू शकतो. राहुल द्रविडनं इंग्लंडमध्ये 217 धावा केल्या आहेत. तर, सुनील गावसकर यांच्या नावावर 221 धावा आहेत. शुभमन गिल हा विक्रम देखील मोडला आहे. शुभमन गिलच्या इंग्लंडमधील धावा केवळ 88 धावा होत्या. शुभमन गिलनं पहिल्या मॅचमध्ये शतक आणि दुसऱ्या मॅचमध्ये द्विशतक झळकावत विक्रमाला गवसणी घातली आहे.

शुभमन गिल आणि रवींद्र जडेजा यांच्या भागीदारीनं डाव फिरवला

भारतानं पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात 211 धावांवर 5 विकेट गमावल्या होत्या. निम्मा संघ तंबूत परतला होता. त्यानंतर रवींद्र जडेजासोबतच्या 203 धावांच्या भागीदारीमुळं इंग्लंड बॅकफूटवरं गेलं.  शुभमन गिलनं रवींद्र जडेजा बाद झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर बरोबर भागीदारी केली. शुभमन गिलनं वयाच्या 25 व्या वर्षीच इंग्लंडच्या धरतीवर नव्या विक्रमला गवसणी घातली आहे.

शुभमन गिल फक्त भारतीय नाहीतर आशियातील कसोटी खेळणाऱ्या क्रिकेट संघांपैकी पहिला कर्णधार ठरला आहे ज्यानं दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलिया या देशांविरुद्ध त्यांच्या देशात द्विशतक केलं आहे. यापूर्वी  तिलकरत्ने दिलशान यानं कॅप्टन म्हणून  193 धावा केल्या होत्या. 2011 मध्ये त्यानं ही खेळी केली होती. याशिवाय शुभमन गिलनं सुनील गावसकर आणि राहुल द्रविड यांचा विक्रम देखील मोडला आहे.

आणखी वाचा

Comments are closed.