IND vs ENG: शुबमन गिलच्या ‘या' खास अंदाजाचे सुनील गावसकर झाले चाहते !

टीम इंडियाचा स्टार खेळाडू आणि कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिलने (Shubman gill) बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात फलंदाजीत कमाल केली आहे. गिलने या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli & Sunil Gavaskar) आणि सुनील गावसकर यांचे अनेक मोठे रेकॉर्ड मोडले. गिलच्या शानदार फलंदाजीमुळे सामना टीम इंडियाच्या बाजूला झुकताना दिसत आहे.

याच दरम्यान कर्णधार शुबमन गिलच्या या कामगिरीमुळे दिग्गज सुनील गावस्कर खूप खुश झाले आहेत. दुसऱ्या कसोटी सामन्यात गिल एका वेगळ्याच अंदाजात दिसला.

फलंदाजीत तर गिलने कमाल केलीच, पण त्याचसोबत कर्णधार म्हणूनही त्याने जबरदस्त कामगिरी केली आहे. बर्मिंगहॅम कसोटीच्या शेवटच्या दिवशी, जेव्हा जेवणानंतर खेळ सुरू झाला, तेव्हा सुनील गावसकर यांनी गिलच्या फिल्ड प्लेसमेंटचं भरभरून कौतुक केलं. पहिल्या कसोटीत गिल थोडा गोंधळलेला दिसत होता, पण दुसऱ्या कसोटीत तसं काही झालं नाही. गिलने खूप आक्रमक शैलीत खेळ दाखवला. नियमितपणे गोलंदाजीत बदल केला, त्यामुळेच टीम इंडिया (Team india) चांगल्या स्थितीत पोहोचली आहे.

कर्णधार गिलने जेव्हा बर्मिंगहॅम कसोटीच्या प्लेइंग 11 मध्ये आकाशदीपला संधी दिली, तेव्हा अनेकांनी त्याच्यावर टीका केली होती. पण आता तो निर्णय योग्य ठरला आहे. आकाशदीपने (Aakash Deep) पहिल्या डावात 4 विकेट्स घेतल्या आणि दुसऱ्या डावातही आत्तापर्यंत त्याने 4 विकेट्स घेतल्या आहेत. आकाशदीपला मोहम्मद सिराजने (Mohmmed Siraj) चांगली साथ दिली. सिराजने पहिल्या डावात 6 विकेट्स घेतल्या आणि दुसऱ्या डावातही 1 विकेट मिळवली आहे. गोलंदाजांचा चांगला पाठिंबा मिळाल्यामुळे गिलच्या नेतृत्वात आणखी चमक आली आहे.

Comments are closed.