2025 मध्ये शुबमन गिल! 1947 मध्ये स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार कोण होता?
सन 1932, तारीख 25 जून भारताने आपला पहिला अधिकृत क्रिकेट सामना खेळला. हा सामना इंग्लंडविरुद्ध होता आणि दमदार गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने तो सामना 158 धावांनी जिंकला. जवळपास 15 वर्षांनंतर, म्हणजेच 1947 मध्ये, भारताला ब्रिटीश राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले.
आज भारत आपला 79 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. त्या काळात केवळ कसोटी (टेस्ट) क्रिकेट खेळले जात होते. पुढील काळात मोहम्मद आझरुद्दीन, सौरव गांगुली, कपिल देव आणि विराट कोहली यांसारखे दिग्गज कर्णधार भारताला मिळाले. पण 1947 मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तेव्हा टीम इंडियाचा (Team india) कर्णधार कोण होता हे तुम्हाला माहिती आहे का?
स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी इफ्तिखार अली खान पटौदी (Iftikhar Ali Khan Pataudi) आणि सी.के. नायडू (C.K Naidu) हे भारतीय संघाचे कर्णधार राहिले होते. काही रिपोर्टनुसार, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, तेव्हा भारतीय संघाकडे कायमस्वरूपी कर्णधार नव्हता. पण, फेब्रुवारी 1948 मध्ये जेव्हा भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा झाला, तेव्हा लाला अमरनाथ (Laala Amarnath) यांची टीम इंडियाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती झाली.
लाला अमरनाथ हे फलंदाज असूनसुद्धा चांगली गोलंदाजी करू शकत होते आणि वेळोवेळी संघासाठी यष्टिरक्षणाची जबाबदारीही त्यांनी घेतली. त्यांनी भारतासाठी 24 कसोटी सामने खेळले, ज्यात 878 धावा केल्या आणि 45 विकेट्स घेतल्या.
स्वातंत्र्य मिळण्याच्या एक वर्ष आधी, म्हणजे 1946 मध्ये, भारताने इंग्लंडचा दौरा केला होता. त्या दौऱ्यावर इफ्तिखार अली खान पटौदी हे भारतीय संघाचे कर्णधार होते.
आझाद भारताचे पहिले कर्णधार लाला अमरनाथ राहिले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने 15 सामने खेळले, ज्यात फक्त 2 विजय मिळवले, 6 सामने गमावले आणि 7 सामने अनिर्णित राहिले. अमरनाथ यांच्या वैयक्तिक कामगिरीकडे पाहिले तर त्यांनी फर्स्ट-क्लास क्रिकेटमध्ये 10,000 हून अधिक धावा केल्या होत्या.
Comments are closed.