शुभमन गिलला काय झालं? 9 विकेट्सवर टीम इंडियाचा डाव अचानक घोषित; BCCIने काय सांगितलं?


शुभमन गिलच्या दुखापतीबाबत बीसीसीआय अपडेट: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील पहिला सामना कोलकात्यात सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताची पहिली खेळी 189 धावांवर संपली असून टीम इंडियाने 30 धावांची छोटीशी आघाडी मिळवली आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 159 धावा केल्या होत्या.

गिल दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट

भारतीय कर्णधार शुभमन गिलला फलंदाजी दरम्यान दुखापत झाली. त्याने फक्त तीन चेंडूंत चार धावा केल्या. हार्मरला खेळताना त्याने बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार मारला, पण त्याचवेळी त्याच्या मान दुखू लागली. फिजिओ लगेचच मैदानात आले, मात्र गिलला रिटायर्ड हर्ट होऊन परतावे लागले. ही घटना 35व्या षटकानंतरच्या ड्रिंक्स ब्रेकनंतर घडली. नंतरही तो फलंदाजीला परत येऊ शकले नाहीत आणि त्यामुळे नवव्या विकेटनंतर भारताचा पहिला डाव संपला.

दुसऱ्या दिवशीही गिल मैदानाबाहेर

गिल फक्त रिटायर्ड हर्टच झाला नाहीत, तर दुसऱ्या दिवशीही त्याने मैदानावर परत पाऊल ठेवले नाही. त्याच्या अनुपस्थितीत उपकर्णधार ऋषभ पंत टीमची जबाबदारी सांभाळत आहेत. पंतला कोच गौतम गंभीर यांच्यासह चर्चा करतानाही पाहण्यात आले. त्यामुळे पंत पहिल्यांदाच कसोटीमध्ये नेतृत्व करताना दिसत आहेत.

बीसीसीआयने काय सांगितलं?

बीसीसीआयने अधिकृतपणे सांगितले की, शुभमन गिलला मानेमध्ये आकडी आली आहे आणि वैद्यकीय टीम त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्याची पुनरागमनाची शक्यता त्याच्या पुनर्प्राप्तीच्या गतीवर अवलंबून असेल.

भारताकडून केएल राहुलने केल्या सर्वाधिक धावा

भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक 39 धावा करत महत्त्वाची भूमिका बजावली. वाशिंगटन सुंदरने 29 धावा केल्या आणि दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. तर ऋषभ पंतने 27, रवींद्र जडेजा 27, अक्षर पटेल 14, ध्रुव जुरेल 14, यशस्वी जैस्वाल 12, कुलदीप यादव 1, मोहम्मद सिराज 1 आणि जसप्रीत बुमराह नाबाद 1 धाव केली. गिलने चार धावा काढल्यानंतर रिटायर्ड हर्ट झाला. दक्षिण आफ्रिकेकडून सायमन हार्मरने चार, तर मार्को जानसेन यांनी तीन विकेट घेतल्या. केशव महाराज आणि कॉर्बिन बॉश यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

हे ही वाचा –

IPL Trade News 2026 : मोहम्मद शमीपासून अर्जुन तेंडुलकर, नितीश राणापर्यंत…; आयपीएलआधी चक्रावणारे टॉप 5 ट्रेड, कोण कोणात्या संघात दाखल?, A टू Z माहिती

आणखी वाचा

Comments are closed.