याला म्हणतात कमिटमेंट! या भारतीय खेळाडूने दुखापत होऊनही सराव थांबवण्यास नकार दिला

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळली जाणार आहे. यासाठी दोन्ही संघांचे खेळाडू प्रचंड घाम गाळत आहेत. मात्र सरावादरम्यान भारतीय फलंदाज शुबमन गिल नेटमध्ये जखमी झाला. नेट प्रॅक्टिस दरम्यान गिलच्या बोटाला दुखापत झाली.

वास्तविक, मोहम्मद सिराज नेट्समध्ये गिलला गोलंदाजी करत होता. या दरम्यान त्याचा एक चेंडू गिलला खेळता आला नाही. सिराजचा चेंडू गिलच्या उजव्या हाताच्या बोटाला लागला. यानंतर त्यानं काही काळासाठी आपला सराव थांबवला. परंतु प्रचंड वेदना होत असताना देखील गिलनं नेट सोडण्यास स्पष्ट नकार दिला.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुबमन गिलला दुखापत होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी दुखापतीमुळे तो पर्थ कसोटीत खेळू शकला नव्हता. त्यावेळी शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. आताच्या दुखापतीनंतर टीमच्या वैद्यकीय पथकानं त्याच्या दुखापतीची पाहणी केली. वैद्यकीय पथकानं गिलला तंदुरुस्त घोषित केलं आहे, जी भारतीय टीम मॅनेजमेंट आणि चाहत्यांसाठी चांगली गोष्ट आहे. अशा प्रकारे शुबमन गिल बॉक्सिंग डे कसोटीसाठी पूर्णपणे तयार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी सामन्यांसाठी अष्टपैलू तनुष कोटियनचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. रवी अश्विनच्या निवृत्तीनंतर कोटियनला भारतीय संघात स्थान देण्यात आलं. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. सध्या 5 कसोटी सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. दोन्ही संघ चौथी कसोटी जिंकून मालिकेत आघाडी घेण्याच्या इराद्यानं उतरतील.

हेही वाचा –

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियाचंच वर्चस्व, 14 वर्षांत केवळ इतके पराभव
रोहित शर्मानंतर भारताचा पुढील कर्णधार कोण होणार? धक्कादायक दावा समोर
“मी खूप निराश आहे, कारण….”; दोन ऑलिम्पिक पदके जिंकलेल्या मनू भाकरने व्यथा मांडली

Comments are closed.