“शुबमन गिलमध्ये टी20 कर्णधार होण्याची क्षमता नाही…” भारताच्या माजी खेळाडूचे खळबळजनक वक्तव्य

च्याटी-२० विश्वचषक २०२६ पूर्वी शुभमन गिलला भारतीय संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. गिलने आशिया चषक २०२५ आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेत अत्यंत निराशाजनक कामगिरी केली होती. अशा परिस्थितीत मॅनेजमेंटने टी-२० विश्वचषकासाठी गिलवर विश्वास दाखवला नाही. मात्र, आता भारताचे माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी गिलच्या कर्णधारपदाबाबत एक मोठे विधान केले आहे.
च्याआकाश चोप्रा यांना असे वाटते की, गिल आता भारतीय टी-२० संघाचा कर्णधार बनू शकत नाही. सध्या गिल कसोटी आणि एकदिवसीय (ODI) सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे, परंतु टी-२० मध्ये त्याला ही जबाबदारी मिळणे कठीण दिसत आहे. आकाश म्हणाले की, “हे कठीण होणार आहे. भारतीय संघाला वाटले होते की जर तिन्ही फॉरमॅटसाठी एकच कर्णधार असेल तर गोष्टी सोप्या होतील, पण तसे अजिबात होणार नाही. मला वाटते की आपण असे करू शकणार नाही कारण तो कसोटी आणि वनडेचा कर्णधार असला, तरी त्याला टी-२० चे कर्णधारपद मिळू शकत नाही. सध्या तरी त्याचे नाव या शर्यतीत दिसणे कठीण आहे, विशेषतः गेल्या चार सामन्यांमधील भारतीय संघाची कामगिरी पाहता.”
च्यागिलने भारतासाठी शेवटची टी-२० मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळली होती. या मालिकेतील ३ सामन्यांत त्याच्या बॅटमधून केवळ २८, ० आणि ४ धावा निघाल्या. त्याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतही गिलची कामगिरी निराशाजनक होती; त्याने २९, ४६, १५, ५ आणि ३७ धावा केल्या होत्या. गेल्या ८ डावांमध्ये गिलला एकही अर्धशतक झळकावता आले नाही, त्यामुळे निवडकर्त्यांना त्याला टी-२० विश्वचषकातून बाहेर काढणे भाग पडले. सध्या गिल आयपीएल २०२६ च्या तयारीमध्ये व्यस्त असून तो गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना दिसेल. त्यानंतर भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध १ कसोटी आणि ३ सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.
Comments are closed.