ब्रेकिंग न्यूज! टीम इंडियाचा कसोटी कर्णधार म्हणून शुबमन गिलची निवड
भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये आजपासून एक नवीन पर्व सुरू झाले आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर जो प्रश्न प्रत्येक चाहत्याच्या मनात घर करून बसला होता, त्याचे उत्तर अखेर मिळाले आहे. बीसीसीआयने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत शुबमन गिलच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. (Shubman Gill) गिलची भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (New Test Captain Of India)
बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी आज दुपारी 1.30 वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. (BCCI Press Conference) त्याचबरोबर गिलकडे कसोटी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रिषभ पंतला उपकर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे. (India Tour England)
गिलची ही निवड अनपेक्षित नसली तरीही महत्त्वाची आहे. जसप्रीत बुमराहही कर्णधारपदाच्या शर्यतीत होता, मात्र वर्कलोड मॅनेजमेंट आणि दुखापतीमुळे त्याचे संपूर्ण दौऱ्यात सहभागी होणे शक्य नसल्यामुळे त्याच्या नावावर विचार होऊ शकला नाही.
गिलचा फलंदाज म्हणून अनुभव, शांत संयमी वृत्ती आणि तरुण नेतृत्वगुण यामुळेच त्याच्यावर कसोटी संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. 20 जूनपासून सुरू होणाऱ्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारत आणि इंग्लंड एकमेकांसमोर असतील, आणि गिलचे नेतृत्व त्यासाठी निर्णायक ठरू शकते.
भारतीय क्रिकेटच्या नव्या युगाची सुरुवात आता शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली होत आहे.
Comments are closed.