DCvsGT: डेविड मिलर विरुद्ध शुबमन गिल-प्रसिद्ध कृष्णाचे प्लॅनिंग, शेवटच्या चेंडूआधीच्या चर्चेचा झाला खुलासा
शुबमन गिल याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने (जीटी) अखेर आयपीएल २०२६ मध्ये पहिला विजय मिळवत गुणतालिकेत आपले खाते उघडले आहे. जीटीने बुधवारी (८ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सच्या त्यांच्यात घरच्या मैदानावर एका धावेने पराभव पराभव केला. या सामन्यात दिल्लीला विजयासाठी शेवटच्या २ चेंडूत २ धावांची आवश्यकता होती. हा सामना गुजरात जिंकेल असे कोणाच्याही ध्यानी नव्हते, मात्र डेविड मिलरच्या एका चुकीने सामन्याचा निकालच पालटला. या सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर गिल आणि वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा यांच्यात नेमके काय संभाषण झाले, हे समोर आले आहे.
जेव्हा दिल्लीला शेवटच्या चेंडूवर जिंकण्यासाठी २ धावांची आवश्यकता होती, तेव्हा गिल आणि कृष्णा यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. त्या चेंडूवर संघाने एकही धाव दिली नाही आणि सामना जिंकला. जेव्हा पाचव्या चेंडूवर मिलरने एकेरी धाव घेतली नाही, तेव्हा आमच्याकडे जिंकण्याची संधी आहे, असे गिल सामन्यानंतर म्हणाला.
शेवटच्या चेंडूवर यॉर्कर टाकावा की स्लोअर बाउन्सर टाकावा, या संभ्रमात जीटी होते. त्यावेळी गिल आणि कृष्णा यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे खुद्द गिलने सांगितले आहे. अशा स्थितीत खूपदा फलंदाज यॉर्करची अपेक्षा करतात, मात्र डीसीविरुद्ध गिल-कृष्णाने चकित करणारी रणनीती आखली आणि ती यशस्वीही झाली. यामध्ये यॉर्करऐवजी स्लोअर बाउन्सर टाकाण्याचे ठरवले.
गिल सामन्यानंतर त्यांच्या रणनीतीबाबत म्हणाला, “यॉर्कर टाकायचा की स्लोअर वन, यावर आम्ही चर्चा करत होतो. खेळपट्टी ज्या प्रकारे खेळत होती ते पाहता, जर स्लोअर वन टाकला तर चौकार मारणे कठीण होईल, असे आम्ही ठरवले.”
गिलने ठरवल्याप्रमाणे घडले, मिलर एका संथ गतीच्या बाउन्सरच्या जाळ्यात अडकला. चेंडू त्याच्या बॅटला स्पर्शही न करता थेट विकेटकीपर जोस बटलर याच्याकडे गेला. बटलरने लगेचच तो स्टम्प्सच्या दिशेने फेकला आणि कुलदीप यादवला धावबाद करत सामना संपवला. हा सामना गुजरातने एका धावेने जिंकला आणि दिल्लीची विजयी घोडदौड थांबवली.
या शेवटच्या चेंडूबाबत राशिद खानने त्याचे मत व्यक्त केले. तो म्हणाला, “मला असे वाटले होते की, पुढच्या चेंडूवर मिलर कदाचित एक धाव घेईल; पण त्याच क्षणी, तुम्ही इतर विविध शक्यतांचाही विचार करता—उदाहरणार्थ, जर पुन्हा एखादा ‘स्लोअर बाउन्सर’ टाकला गेला, तर विकेट मिळण्याची संधी निर्माण होऊ शकते आणि नेमके तसेच घडले. जर त्याने त्याआधीच एक धाव घेतली असती, तर सामना कदाचित आणखी पुढे गेला असता; पण या गोष्टींची जाणीव आपल्याला केवळ सामना संपल्यानंतरच होते. अखेरीस, हा एक अत्यंत रोमांचक सामना ठरला. “
दिल्ली या पराभवामुळे गुणतालिकेत चौथ्या स्थानी आले आहे.
Comments are closed.